हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण; मुख्य आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, 1 लाखांचे होते बक्षीस
Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Hathras Stampede: उत्तर प्रदेशच्या हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील प्रमुख आरोपी देव प्रकाश मधुकरला अटक करण्यात आले आहे. त्याच्यावर एक लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. बाबा साकार हरि विश्वचे वकिल एपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरस सत्संग चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडे सोपवलं आहे. दिल्लीमध्ये त्याला एसटीएफ आणि एसआयटीच्या टीमकडे सोपवण्यात आलं आहे. त्याचा कबुलीजबाब घेतला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देव प्रकाश मधुकर याने दिल्लीत आत्मसमर्पण केले आहे. तो नजफगडच्या रुग्णालयात दाखल होता. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. तिथे ECG रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर एपी सिंहने पोलिसांना याबाबत सूचना दिली. नंतर यूपी एसटीएफचे एक पथक रुग्णालयात पोहोचले आणि मधुकरला अटक केली. बाबा साकार हरि विश्व याने सर्वोच्च न्यायालयाचे वकील एपी सिंह यांना वकिलपत्र दिले आहे. सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत समाजकंटकांचा हात असल्याचा दावा बाबांनी केला आहे. तसंच, आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एपी सिंग यापूर्वी निर्भया प्रकरण आणि सीमा हैदर या प्रकरणाचे खटले लढवले आहेत.
पदावरुन हटवण्यात आले
मधुकरला अटक करण्यापूर्वी त्याला उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील शितलपूर ब्लॉकमध्ये तांत्रिक सहाय्यक पदावरून हटवण्यात आले होते. 2010 पासून ते 20 पंचायतींमधील मनरेगाच्या कामांवर देखरेख करत होते.एफआयआरमध्ये मधुकरचे नाव मुख्य आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. हातरस पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. यानंतर त्यांना पदावरून हटवून त्यांचा करार संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली, अशी माहिती शितलपूर ब्लॉक विकासचे अधिकारी दिनेश शर्मा यांनी दिली आहे.
घटना घडल्यानंतर फरार झालेल्या देव प्रकाश मधुकरविरोधात वॉरंटदेखील जारी केला होता. अलीगढ पोलीस क्षेत्रातील पोलीस महानिरीक्षक शलभ माथुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्संगचे प्रभारी देव प्रकाश मधुकर याने सत्संगसाठी परवानगी मागितली होती. त्याचे एफआयआरमध्ये नाव असूनही तो फरार आहे. त्याच्या अटकेसाठी एक लाखांचे बक्षीसही जारी करण्यात आले आहे.