Hathras Stampede: उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झालाय. आजही लोकं आपल्या जवळचे नातेवाईक न सापडल्याने आक्रोश करतायत. काही लोक अशीदेखील आहेत, जी नातेवाईकांना शोधण्यासाठी भटकतायत. कधी शवागर तर कधी रुग्णालयाच्या फेऱ्या मारतायत. बदहवास येथील राकेश कुमारदेखील यातलेच एक..जे आपल्या बहिणीला पाहण्यासाठी व्याकूळ झालेयत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राकेश हे आपली हरवलेली बहिण हरबेजी देवीच्या शोधात आहे. त्याने आतापर्यंत 100 हून अधिक मृतदेह पाहिले आहेत. पण त्यांना त्यांची बहिण कुठे सापडली नाही. हरबेजी या 50 वर्षांच्या आहेत. मी बाईकवरुन हाथरस, एटा आणि अलीगढमधील पोस्टमार्टम हाऊसमधील सर्व खोल्या पाहिल्या. पण हरबेजी देवी यांच्या पत्ना लागला नसल्याचे राकेश सांगतात.


राकेश कुमार हे यूपीच्या कासगंज येथे राहणारे आहेत. मंगळवारी मला माझ्या अलीगढमध्ये राहणाऱ्या भावोजींचा फोन आला.  हरबेजी सत्संगला गेली होती पण परत आली नसल्याचे त्यांनी सांगितले. बहिणीची बातमी ऐकल्यावर राकेश यांना धक्का बसला. त्यांनी लगेच बाईक काढली आणि चेंगराचेंगरी झालेले ठिकाण गाठले.  पण त्यांना आपल्या बहिणीबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाही. 


काही मृतदेह हाथरस येथे तर काही अलिगढ येथे पाठवण्यात आले आहेत. मी बहिणीला शोधत तिथपर्यंत पोहोचलो. जखमींवर उपचार सुरु होते असा एमर्जन्सी वॉर्डदेखील मी पाहिला पण ती दिसली नसल्याचे राकेश सांगतात. यानंतर प्रशासनाने जारी केलेली मृतांची यादी पाहिली. प्रत्येक हेल्पलाइनवर संपर्क केला. तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण माझे प्रयत्न व्यर्थ ठरले.  


माझ्या बहिणीचा शोध सुरु ठेवेन 
आतापर्यंत तरी मला माझी बहिणी सापडली नाहीय. पण मी हार मानणार नाही. तिचा शोध मी सुरुच ठेवेन. हरबेजी यांना 2 मुलगे आणि 2 मुली आहेत. राकेश कुमार यांच्यासारखे असे अनेकजण आहेत, जे आपल्या जवळच्यांना शोधतायत. तसेच शवागरात आपल्या जवळच्या नातेवाईकांचा शोध घेतायत. 


घटनेची माहिती मिळताच मी घटनास्थळी गेलो. प्रत्येक ठिकाणी माझ्या आईचा शोध घेतला पण ती नाही सापडली असे मथुराच्या विशाल कुमार यांनी सांगितले. पण त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आग्रा येथे पाठवण्यात आल्याचे कळाले. माझी आई साधारण 10 वर्षांपासून भोले बाबाची भक्त होती, असे त्यांनी सांगितले. 


हाथरसमध्ये एका सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 121 झाली आहे. यूपी पोलिसांनी सत्संग आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसेच तत्संगचे आयोजन करणाऱ्या भोले बाबाचा शोध सुरु आहे. पोलिसांनी त्याच्या आश्रमावर छापा टाकला पण तो सापडला नाही.