मुंबई : जेव्हा तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करता किंवा एखादी वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतो, त्याला ऑनलाईन सर्च करता. त्यानंतर ती वस्तु तुम्हाला इंटरनेटवर सर्वत्र दिसू लागते. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला शूज विकत घ्यायचे आहेत आणि तुम्ही ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइटवर काही शूज एक-दोन वेळा पाहिले असतील, तर तुम्ही इंटरनेट चालवता तेव्हा तुम्हाला ते शूज सर्वत्र दिसू लागतील. त्यानंतर तुम्ही सोशल मीडियाही चालवलात तर तुम्हाला त्या चपलांच्याच जाहिराती दिसू लागतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कदाचित तुमच्याही हे आधी लक्षात आले असेल, पण हे कसे घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्या सोबत देखील हे अनेकदा घडलं असेल, परंतु असे का होते हे तुम्हाला माहितीय का?


जर तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर आज आम्ही असे का घडते याचे कारण सांगणार आहोत आणि प्रत्येक वेबसाइटला हे कसे कळते की, तुम्हाला आता शूज खरेदी करावे लागतील किंवा शूज खरेदी करण्याचा विचार करत आहात. तुम्ही दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट झालात किंवा तुमच्या आयुष्यात काही बदल घडणार आहेत, जसे घरामध्ये मुलाची प्रसूती होणार आहे, तेव्हा तुम्हाला त्यानुसार जाहिराती दिसू लागतात.


यामागे काही तांत्रिक कारणे आहेत, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेबसाइटवर एकाच उत्पादनाच्या जाहिराती दिसू लागतात. इंटरनेट जाहिराती तुम्हाला कशा प्रकारे टार्गेट करतात आणि त्यांना तुमच्या गरजा कशा कळतात याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.


असे का घडते?


हे घडतं ते कुकीजमुळे तुम्ही वेबसाइटला भेट देता आणि तेथे काही क्रियाकलाप करता, ते तुमच्या ब्राउझरवर कुकीज सेव्ह करतात. आता प्रश्न असा आहे की, या कुकीज काय आहेत? कुकी हा एक छोटा प्रोग्राम आहे जो वेबसाइटला तुम्हाला विशिष्ट वापरकर्ता म्हणून लक्षात ठेवण्याची परवानगी देतो.


प्रत्येक वेबसाइट हे काम करते आणि तुमचा मूड जाणून घेते. तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा तुम्ही वेबसाइटला भेट देता तेव्हा तुम्हाला कुकीजला परवानगी देण्यास सांगितले जाते आणि तुम्ही त्याला यस करता.


यामुळे होतं काय की, तुमचा इतिहास तुमच्या कुकीजद्वारे जतन केला जातो आणि नंतर जाहिरात कंपन्या तुम्हाला सहजपणे ट्रॅक करतात. कारण जेव्हा तुम्ही वेबसाइटवर जाता, तेव्हा तुम्ही तिथे कुठे क्लिक केलेत, तुम्ही किती वेळ थांबता आणि कोणत्या विशिष्ट लिंक्सवर क्लिक करत आहात, त्याचा डेटा तयार केला जातो. त्या डेटाच्या आधारे तुम्हाला सर्वत्र तो कंटेन्ट दिसतो.


तुमच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी लक्षात ठेवल्या जातात आणि त्यामुळे जाहिरात स्पेसमध्ये तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीनुसार जाहिराती दिसायला लागतात. त्याच वेळी, जर इतर कोणताही कंटेन्ट तुम्हाला हवा असेल, तर तुम्हाला फक्त मागील शोधाच्या आधारावर सामग्री मिळू लागते. जेव्हा तुम्ही एकाच प्रकारचे अधिक व्हिडीओ पाहता तेव्हा सोशल साइट्सवर तुम्हाला स्क्रीनवर अशाच प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात.


विशेष गोष्ट अशी आहे की, सर्व वेबसाइट्स एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि आपल्या कुकीज एकमेकांशी शेअर करतात, म्हणजेच इतर वेबसाइटलाही तुमच्या आवडीनिवडी किंवा नापसंतीची माहिती मिळते. हे आरोप फेटाळून लावले असले तरी लोकांचे संभाषण रेकॉर्ड करून डेटा तयार करून कंपन्यांना दिला जात असल्याचा आरोप अनेक कंपन्यांवर करण्यात आला आहे.