तरुणीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेला, काही दिवसांनी ती जिवंत परतली, पोलिसांमुळेच झाला मोठा गोंधळ
Girl Faked Murder Case: पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं तरुणाला 4 महिने तुरुंगात काढावे लागले आहे. या प्रकरणी कोर्टाने हस्तक्षेप करत त्याची सुटका केली आहे.
Girl Faked Murder Case: पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं एका निर्दोष तरुणाला चार महिने तुरुंगात राहावे लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. ज्या तरुणीच्या हत्या प्रकरणात तरुणाला दोषी ठरवून तुरुंगात डांबले होते तिच काही महिन्यात जिवंत परत आली. पोलिसांनी केलेल्या चुकीच्या तपासामुळं हा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे.
निर्दोष तरुणाला केली अटक
झारखंड राज्यातील रांची शहरात ही घटना घडली आहे. तरुणीच्या हत्याप्रकरणात एका निर्दोष तरुणीला चार महिने तुरुंगात राहावे लागले आहे. या प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने निर्दोष व्यक्तीला नुकसानभरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचे आदेश दिला आहे. त्याचबरोबर कोर्टाने, पोलिसांच्या तपासक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तपासात केलेल्या निष्काळजीपणामुळं निर्दोष युवकाला विनाकारण तुरुंगात राहावे लागले.
पोलिसांनी केला चुकीचा तपास
२०१४मधील हे प्रकरण आहे. रांचीयेथील चुटिया परिसरात राहणारी प्रिती नावाची मुलगी 14 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर 2 दिवसांनंतर 16 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी रांचीयेथील एका रोडवर बुंडू थाना परिसरात एका तरुणीचे अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असता ती प्रितीच असल्याचे त्यांनी सांगितली. त्यानंतर प्रितीच्या हत्या प्रकरणात रांची येथे राहणाऱ्या अजीत कुमारसह तीन जणांना अटक केली.
तीन जणांवर पोलिसांची कारवाई
अजीत कुमारला अटक करुन कोठडीत टाकण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तीन जाणांविरोधात तरुणीचे अपहरण, गँगरेप आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न हे आरोप लावण्यात आले. तसंच 14 मे 2014 रोजी आरोपपत्र कोर्टात दाखल केले. मात्र, यानंतर काही दिवसांतच प्रिती जिवंत असल्याचे कळले. त्यानंतर कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर निर्दोष युवकांची जेलमधून सुटका करण्यात आली.
नुकसानभरपाई देण्याचा आदेश
दरम्यान, अजीत कुमारला चुकीच्या आरोपांखाली तुरुंगात डांबल्याप्रकरणी नुकसानभरपाई आणि दोषी पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली केली. त्यानंतर झारखंड हायकोर्टात रिट याचिकाही दाखल करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायाधीक्ष एसके द्विवेदी यांच्या खंडपीठाने तरुणाला नुकसानभरपाई देण्याचा आदेश जारी केला आहे.