SBI नंतर, HDFC बँकेकडून बंपर ऑफर...व्याजदर आणि प्रोसेसिंग फीवर विविध सवलती उपलब्ध
आपण या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास, कर्जाची रक्कम लवकरात लवकर दिली जाईल.
मुंबई : सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, बँकिंग क्षेत्र किरकोळ कर्जदारांना विविध ऑफर देत असतात. सोमवारी SBIने कार कर्ज, सुवर्ण कर्ज, वैयक्तिक कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आणि व्याज दरात विशेष सवलत जाहीर केली होती. HDFC Bank ने देखील आज एसबीआय पाठोपाठ फेस्टीव्हल ऑफर जाहीर केली आहे.
या ऑफरअंतर्गत, HDFC Bank सिक्युरिटीजच्या कर्जासाठी प्रक्रिया शुल्क अर्थात Loan Against Securities प्रोसेसिंग फी कमी करून ते आता 750 रुपये केले आहे. या कर्जाचा व्याजदर 9.90 टक्के असेल. ही ऑफर फक्त 30 सप्टेंबर पर्यंत उपलब्ध आहे. Loan Against Securities अंतर्गत ग्राहक त्याच्या होल्डिंग शेअर्स, म्युच्युअल फंड आणि इतर सिक्युरिटीजवर कर्ज घेऊ शकतो.
Loan Against Securities अंतर्गत कर्जाचे किमान मूल्य 2 लाख रुपये असावे. यामध्ये इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, एलआयसी पॉलिसी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, गोल्ड डिपॉझिट सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, नाबार्ड भविष्य निर्माण बॉण्ड आणि नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर अर्थात एनसीडी यांचा समावेश आहे. या कागदपत्रांवर कर्ज घेतले जाऊ शकते.
आपण या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास, कर्जाची रक्कम लवकरात लवकर दिली जाईल. जर तुम्हाला तुमच्या होल्डिंग शेअरवर कर्ज मिळवायचे असेल, तर HDFC नेट बँकिंग मध्ये लॉग इन करा. येथे डीमॅट खात्याचा पर्याय उघडतो. तिथे तुम्हाला लोन Loan Against Securitiesचा पर्याय निवडावा लागेल.
आपला अर्ज OTP द्वारे वेरिफाय केला जातो. NSDL आणि CSDLच्या मदतीने आपले शेअर गहाण ठेऊ शकता. यानंतर तुम्हाला कर्ज वितरित केले जाईल.
सोमवारी SBIने सांगितले की, कार कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहकांना कारसाठी एकूण किमतीच्या (ऑन रोड) 90 % पर्यंत कर्ज मिळेल. या व्यतिरिक्त, बँक YONO अॅपद्वारे अर्ज करणाऱ्या ग्राहकांना 0.25 टक्के विशेष व्याज सवलत देण्यात येईल.
YONO च्या ग्राहकांना सुरुवातीला 7.5 टक्के दराने कार कर्ज उपलब्ध होईल, असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, बँक आपल्या सुवर्ण कर्जावर ग्राहकांना 0.75 टक्के कमी व्याज देत आहे.
ग्राहक 7.5 टक्के वार्षिक व्याज दराने बँकेच्या सर्व शाखेकडून कर्ज घेऊ शकतील. YONO द्वारे सुवर्ण कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.
SBIने वैयक्तिक आणि पेन्शन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी सर्व शाखेवर प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. कोविड -19 महामारीविरूद्ध लढा देणाऱ्या लोकांना, जसे की आरोग्यसेवा कामगारांना वैयक्तिक कर्जावर 0.50 टक्के विशेष सूट दिली जाईल. ही ऑफर लवकरच कार आणि सुवर्ण कर्जासाठी देखील लागू होईल.