मुंबई : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने मंगळवारी माहिती दिली की, ते आपल्या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्ममधील गोंधळ दूर करण्यासाठी पावले उचलत आहेत आणि सेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्राथमिकतेवर काम करीत आहेत. नेटबँकिंग आणि मोबाईलबँकिंग अ‍ॅपवरून सेवा मिळत नसल्याने बँकेच्या काही ग्राहकांनी तक्रार केली होती. एचडीएफसी बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही या समस्येवर मात करण्यासाठी प्राधान्याने काम करत आहोत. या अडचणीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करोत आणि काही काळानंतर पुन्हा प्रयत्न करा अशी विनंती करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंकेच्या ग्राहकांना सेवेत व्यत्यय येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी बँकेला सेवेत येणाऱ्या अडचणींबद्दल दंड ठोठावला होता.


गेल्या दोन वर्षात सेवा खंडित झाल्यामुळे आरबीआयने एचडीएफसी बँकेला नवीन डिजिटल बँकिंगसाठी पुढाकार घेण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यास तात्पुरती बंदी घातली होती.


नोव्हेंबर, 2018 आणि डिसेंबर, 2019 रोजी बँकेच्या इंटरनेट बँकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याने बँकेने बँकेला दंड ठोठावला. आवर्ती सेवातील गैरप्रकारांची कडक दखल घेत आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिसेंबरमध्ये सांगितले की, नवीन सेवा सुरू करण्यापूर्वी एचडीएफसी बँकेने आपली आयटी प्रणाली अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.


खासगी क्षेत्रातील मालमत्तांच्या बाबतीत एचडीएफसी बँक सर्वात मोठी बँक आहे. पेमेंट प्रोसेसिंग क्षेत्रात बँकेचा मोठा वाटा आहे. HDFC बँकेकडे 1.49 कोटी क्रेडिट कार्ड ग्राहक आणि 3.38 कोटी डेबिट कार्ड ग्राहक आहेत.