HDFC बँकेतील खातेधारकांसाठी खुशखबर! होऊ शकतो मोठा फायदा
ही दरवाढ 12 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी आणि नामांकित बँक म्हणजे hdfc. अनेक खासगी कंपन्यांचे सॅलरी खाती देखील याच बँकेत असतात. होम लोनसाठी ही बँक प्रसिद्ध आहे. आता या बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी एक खास बातमी आणली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
ही दरवाढ 12 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. HDFC बँकेने त्यांच्या मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD) चे व्याजदर बदलले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास सेवा देखील आणल्या आहेत. HDFC बँकेने 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवर दर बदलले आहेत.
आता FD वर 2.50 ते 5.60% पर्यंत व्याज मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना आधीपेक्षा 0.50% अधिक व्याज मिळणार आहे. 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD करता येणार आहे. HDFC बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेव (FD) सुविधा देते.
कसे आहेत नवे व्याजदर जाणून घेऊया
7-14 दिवस- व्याज दर - 2.50% , ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर - 3.00%
15-29 दिवस- व्याज दर - 2.50%, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर - 3.00%
30-45 दिवस- व्याज दर - 3.00%, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 3.50%
46-60 दिवस - व्याज दर- 3.00%, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 3.50%
61-90 दिवस - व्याज दर- 3.00%, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 3.50%
91 दिवस ते 6 महिने - व्याज दर- 3.50%, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 4.00%
6 महिने 1 दिवस ते 9 महिने- व्याज दर- 4.40%, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 4.90%
9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी 4.40% , ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 4.90%
1 वर्ष - व्याज दर- 4.90%, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 5.40%
1 वर्ष 1 दिवस - व्याज दर- 2 वर्ष 5.00% , ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 5.50%
2 वर्ष 1 दिवस - व्याज दर- 3 वर्ष 5.20% , ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 5.70%
3 वर्ष 1 दिवस - व्याज दर- 5 वर्ष 5.40%, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर - 5.90%
5 वर्ष 1 दिवस - व्याज दर- 10 वर्ष 5.60%, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर- 6.35%
ज्येष्ठ नागरिकांना फिक्स डिपॉझिटसोबतच आता रिकरिंग डिपॉझिट RD वर देखील जास्तीचं व्याजदर मिळणार आहे.