नवी दिल्ली - जर नजीकच्या भविष्यात तुमची मोटारीसाठी कर्ज घेण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी दोन किफायतशीर प्लॅन एचडीएफसी बॅंकेने आणला आहे. या प्लॅननुसार तुम्ही १ ते २० लाखांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. त्याचबरोबर या नव्या प्लॅनची खासियत अशी आहे की, यामध्ये एकूण हफ्त्यांमध्ये २४ टक्क्यांपर्यंत फायदा होऊ शकतो. स्टेप अप ईएमआय असे या प्लॅनचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसऱ्या प्लॅनचे नाव बलून ईएमआय असे आहे. यामध्ये ग्राहकांना २० लाखांपासून ५० लाखांपर्यंतचे लोन मिळू शकते. या प्लॅनमध्येही ग्राहकांची एकूण हफ्त्यांमध्ये ३१ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
नव्या प्लॅनच्या रचनेनुसार सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहकांना कमी ईएमआय भरावा लागतो. तर नंतरच्या काळात ईएमआयची रक्कम वाढू शकते. 


मोटारींवरील कर्जांची मागणी वाढण्याची शक्यता
या दोन्ही प्लॅन्समुळे ग्राहकांकडून मोटारींसाठीच्या कर्जाची मागणी १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मोटारींसाठी कर्ज देण्यामध्ये एचडीएफसी बॅंकेचा देशातील वाटा २० टक्के आहे.