मुंबई : HDFC Bank RD Interest Rates: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनंतर आता एचडीएफसी बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. आयसीआयसीआय बँकेनंतर आता एफडीने व्याजदर वाढ केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचडीएफसी बँकेने आवर्ती ठेवीवरच्या (आरडी) व्याजदरातही वाढ केली आहे. यापूर्वी IDFC फर्स्ट बँकेनेही ग्राहकांना आनंदाची बातमी दिली होती. त्यामुळे या बँकांमध्ये ठेवीवर तुम्हाला चांगले व्याज मिळणार आहे. ICICI ने आपल्या मुदत ठेवींच्या दरात वाढ केली होती. आता एचडीएफसी बँकेने आवर्ती ठेवीवर (आरडी) व्याज वाढवले ​​आहे. बँकेने 17 मे 2022 पासून वाढीव दर लागू केला आहे.


6 महिन्यांच्या RD वर 3.50 टक्के व्याज


खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने केलेला हा बदल 27 महिने ते 120 महिन्यांपर्यंतच्या RD वर लागू करण्यात आला आहे. बँक 6 महिन्यांसाठी RD वर 3.50 टक्के व्याज देणे सुरू ठेवेल. बँकेने 27 महिने ते 36 महिन्यांत मुदत पूर्ण होणाऱ्या RD वर व्याजदर 5.20 टक्क्यांवरून 5.40 टक्के केला आहे. त्याचवेळी, 39 ते 60 महिन्यांत ठेव पूर्ण होणार्‍या RDवरील व्याजदर 5.45 टक्क्यांवरून 5.60 टक्के करण्यात आला. 90 ते 120 महिन्यांसाठी आरडीवर व्याजदर आधी 5.60 टक्के होता, परंतु आता तो 15 आधार अंकांनी वाढवून 5.75 टक्के करण्यात आला आहे.



0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम


ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 6 महिन्यांपासून 60 महिन्यांपर्यंत RD वर 0.50 टक्के अतिरिक्त प्रीमियम मिळत राहील. 5 ते 10 वर्षांच्या कालावधीच्या आवर्ती ठेवींवर, ज्येष्ठ नागरिकांना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 0.50 टक्क्यांच्या प्रीमियम व्यतिरिक्त 0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम मिळेल. ते विशेष ठेवी अंतर्गत आहे.


ज्येष्ठ नागरिकांना आणखी मोठा दिलासा


HDFC बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम दिला जाईल. ज्यांना 5 वर्षांसाठी 5 कोटींपेक्षा कमी रकमेची FD बुक करायची आहे त्यांना हा लाभ मिळेल. ही ऑफर ज्येष्ठ नागरिकांनी बुक केलेल्या नवीन एफडी व्यतिरिक्त नूतनीकरणावर लागू होईल.


यापूर्वी ICICI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला होता. 290 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याज बँकेने बदलले आहे. याशिवाय IDFC First Bankने देखील(IDFC First Bank FD Rates) FD च्या व्याजदरात 1 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. हा बदल 23 मे पासून लागू करण्यात आला आहे.