अनेकांचे Salary Account असणाऱ्या बँकेची UPI सेवा ठप्प; `हे` दोन दिवस पैसे सोबतच ठेवा, नाहीतर...
UPI Payment Service : तुम्हीही सतत युपीआयच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करता का? जाणून घ्या काय आहे नेमका गोंधळ, का बंद राहील ही सेवा?
UPI Payment Service : देशातील सर्वात मोठी खासगी बँक अशी ओळख असणाऱ्या आणि अनेकांचेच Salary Account असणाऱ्या बँकेनं अचानकच UPI सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळं Cash सोबत न बाळगणाऱ्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात एचडीएफसी या बँकेकडून दोन दिवस, ठराविक वेळेमध्ये युपीआय सेवा बंद ठेवली जाणार आहे. ज्यामुळं यार अवलंबून असणाऱ्या अनेकांनाच गैरसोय होणार आहे.
HDFC बँकेच्या संकेतस्थळावरून देण्यात आलेल्या माहितीनुसार युपीआयव्यतिरिक्त इतर सर्व सुविधा मात्र बँकेकडून सुरू ठेवल्या जाणार आहेत. दरम्यान, बँक ग्राहकांना 5 आणि 23 नोव्हेंबर रोजी युपीआय बंद राहणार असल्यामुळं व्यवहारातील गैरसोयीचा सामना करावा लागेल. साधारण 3 तासांसाठी ही सेवा बंद राहणार असून, सिस्टीम अपग्रेडेशनसाठी बँकेनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
बँकेनं दिलेल्या माहितीनुसार युपीआय सेवा बंद असताना आणखी काही सेवाही प्रभावित असतील असं सांगण्यात आलं आहे. ज्यामध्ये Current आणि Saving अकाउंटवरून क्रेडिट काऱ्ड आणि नॉन फायनान्स युपीआय देवाणघेवाण होणार नाही. एचडीएफसी बँकेच्या युपीआय हँडलचा वापर करणाऱ्या सर्व खातेधारकांसाठी मोबाईल बँकिंग, Gpay, whats app pay, paytm, श्रीराम फायनान्स, मोबीक्विक आणि क्रेडिट पे वरील आर्थिक आणि बिगर आर्थिक युपीआय व्यवहार प्रभावित होईल. शिवाय सर्व प्रकारचे युपीआय ट्रान्झॅक्शनही बंद राहतील.
हेसुद्धा वाचा : प्रेमाने मागितलं असतं तर... औक्षण दूरच पण, भाऊबिजेच्याच दिवशी सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका
UPI म्हणजे काय?
UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही एक स्मार्टफोन ट्रान्सफर सर्विस असून, या माध्यमातून UPI आयडीच्या मदतीनं बँक ग्राहक/ खातेधारकांना पैशांची देवाणघेवाण करण्याची मुभा देते. या व्यवहारांचा तपशील बँकेच्या स्टेटमेंटमध्येही दिसतो.
एचडीेफसी बँकेकडून ही सेवा बंद राहणार असल्यामुळं पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी UPI वर अवलंबून असणाऱ्यांची पंचाईत होणार आहे. डिजिटायझेशनच्या पर्वापासून अनेकांनीच पैसे सोबत बाळगण्याची सवय मोडली पण, यामुळं वेळप्रसंगी अडचणींनी सुद्धा डोकं वर काढलं. अनेकांनाच आता सोबत पैसे बाशळगण्याचा विसर पडल्यामुळं अशा मंडळींसाठी दोन दिवस अडचणीचे असतील हे खरं.