नवी दिल्ली : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे अशा घटनांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक बँक प्रयत्नशील आहे. शिवाय आपल्या ग्राहकांना ते वारंवार सतर्क देखील करत असतात. दरम्यान सायबर गुन्ह्यांच्या पाार्श्वभूमीवर HDFC बँकेने एक योजना हाती घेतली आहे. 'मुंह बंद रखो' (Mooh Band Rakho) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेद्वारे बँक येत्या ४ महिन्यांत देशभरात १ हजार कार्यशाळा घेणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यशाळेच्या माध्यमातून HDFC बँक ग्राहकांना व्यवहार सुरक्षितपणे कसे करता येतील याचं प्रशिक्षण देणार आहे. आपल्या कार्डची माहिती किंवा सीव्हीव्ही डेट, ओटीपी इतर माहिती केणासोबतही शेअर करू नये. या सगळ्या प्रकरणातून स्वतःचा कसा बचाव करता येईल त्याचप्रमाणे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी कशी मदत होणार या गोष्टी कार्यशाळेत सांगणार आहे.


आपल्या ग्राहकांच्या पैशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बँकेने आणखी एक पाऊल उचलले आहे. बँकेने म्हटले आहे की संशयास्पद व्यवहार झाल्यास बँकेचा कर्मचारी ग्राहकास विशिष्ट क्रमांकावरुन कॉल करेल.  बँक 61607475 या नंबरवरून फोन करून खातर जमा करेल. 


त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्राहकांनी बँकेने जारी केलला नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करणं महत्त्वाचं आहे. शिवाय अधिक माहितीसाठी ग्राहक टोल फ्री नंबर - 18002586161 संपर्क साधू शकतात.