Baby Girl Has a Big Heart: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आहेत. या ना त्या कारणाने व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला बरीच शिकवण देऊन जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लहान मुलं किती निरागस असतात असा प्रश्न पडल्याशिवाय राहाणार नाही. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला या वाक्यात तथ्य वाटेल. निरागस बालकांना कसलीच हाव नसते. आपल्या पदरात आहे नाही ते सर्वस्वी देण्याची मानसिकता पाहून हृदय भरून येईल. हा व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यावर तुम्ही इतकंच म्हणाल की, हे एक वेगळच विश्व आहे आणि परमेश्वराची वेगळीच किमया आहे. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेहक नावाच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात एक लहानगी फरसाण खाताना दिसत आहे. यावेळी मोबाईलमधून चित्रिकरण करणारी व्यक्ती खाऊ घेण्यासाठी हात पुढे करते. तेव्हा त्या मुलीच्या हातात थोडंसा खाऊ असतो. अशावेळी क्षणाचाही विचार न करता मुलगी पॅकेटमध्ये हात घालते आणि मुठभर फरसाण समोरच्या व्यक्तीला देते. हा क्षण पाहिल्यानंतर ऊर भरून येतो. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. 



25 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.