प्रथमेश तावडे, झी मीडिया: संपूर्ण देशाला हदरवणाऱ्या बहुचर्चित श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या (Aftab Poonawalla) पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज त्याची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Murder Case) प्रकरणात आजचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबची आज पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये (Forensic Lab) ही टेस्ट घेतली जाईल. टेस्टआधीची संपूर्ण प्रक्रिया दिल्ली पोलिसांनी कालच (23 नोव्हेंबर) पूर्ण केलीय. ही सर्व टेस्ट व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली जाणार आहे. हत्येमागचा उद्देश, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले अशा विविध प्रश्नांची उत्तरं आफताबकडून घेतली जातील. दरम्यान पोलिसांनी आफताबच्या (Aftab Poonawalla) कुटुंबाचीही जबाब नोंदवला. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब मुंबईत आला होता. तेव्हा त्याने कुटुंबीयांना काही माहिती दिली होती का, हत्येसंदर्भात काही माहिती होती का असे प्रश्न पोलिसांनी कुटुंबीयांना विचारलेत.


वसई पोलिसांकडे लेखी तक्रार 


श्रद्धा हत्याकांडात (Shraddha Murder Case) सर्वात मोठा खुलासा समोर आलाय. 2020 मध्ये श्रद्धाने वसई पोलिसांकडे (vasai police) आफताबची लेखी तक्रार केली होती. याबाबत झी 24 तासकडे त्याची Exclusive प्रत आहे. या तक्रारीमध्ये श्रद्धानं आफताब ब्लॅकमेल करायचा. शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला अशी तक्रार श्रद्धाने यात दिलीय. माझी हत्या करुन तुकडे करेल अशी धमकीही आफताबनं दिल्याचं श्रद्धाच्या तक्रारीत म्हटलंय आहे. 



आफताबची पॉलीग्राफ चाचणी होणार 


दरम्यान, या सर्व खटल्याच्या अनुषंगाने आफताबची पॉलीग्राफ (Aftab Poonawalla's polygraph test) चाचणीही करण्यात येणार आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना त्यासाठी परवानगी दिली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आफताब चुकीची माहिती देत ​तपास वळवत असल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं. मागील आठवड्यात न्यायालयाने नार्को चाचणीलाही परवानगी दिली होती.


वाचा: कुणी मारलं चार वर्षाच्या 'अलोक'ला? अनाथ आश्रमाच्या मागे सापडला मृतदेह 


या दरम्यान, पोलिसांनी जी माहिती या प्रकरणात दिली आहे त्यानुसार अलिकडे श्रद्धा आणि आफताब यादोघांमध्ये भांडणं वाढली होती. या दोघांनाही एकमेकांवर संशय होता. आफताबला वाटत होतं की श्रद्धाच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे. तर श्रद्धा हा दावा करत होती की आफताबच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलं आहे. याच वादातून आफताबने 18 मे 2022 ला श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.  


श्रद्धाची पोलिसांत आफताब विरोधात लेखी तक्रार


'आफताब मला ब्लॅकमेल करायचा'
'शिवीगाळ करुन मला मारायचा'
'गळा दाबुन हत्या करण्याचा प्रयत्नही केला'
2020 मध्ये श्रद्धाकडून पोलिसांत तक्रार