Trending News : क्रिडा अकादमीतून (Cricket Academy) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्रिकेट प्रशिक्षकाने अल्पवयीन खेळाडूकडून (Minor Players) मसाज करुन घेत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गंभीर दखल घेत या प्रशिक्षकाला निलंबित (Suspended) करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) देवरिया स्पोर्ट्स अकादमीतली (Deoria Sports Academy) ही घटना आहे. या अकादमीत अब्दुल अहद (Abdul Ahad) यांची क्रिकेट प्रशिक्षक (Cricket Coach)  म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अब्दुल अहद यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून अकादमीतल्या एका अल्पवयीन खेळाडूकडून अब्दुल अहद पाठिची मालिश करुन घेतल्याचं दिसत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी क्रीडा उपसंचालक आरएन सिंग यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली करण्यात आली आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल झाला  व्हिडिओ
दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. याचा तपास केला असात हा व्हिडिओ देवरियामधल्या रविंद्र किशोक शाही स्पोर्ट्स अकादमीतला असल्याचं समोर आलं. या व्हिडिओत क्रिकेट कोच आणि वॉर्डन अब्दुल अहद अल्पवयीन मुलाकडून मालिश करून घेत होते. हा व्हिडिओ ऑगस्ट 2022 मधला असल्याचं समोर आलं आहे. 


खेळाडूंचा प्रशिक्षकावर गंभीर आरोप
धक्कादायक म्हणजे याच अकादमीतील एक खेळाडूचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या विद्यार्थ्याने आपल्या प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत. प्रशिक्षक अब्दुल अहद खेळाडूंना अश्लील शिवीगाळ करत असल्याचं आरोप करण्यात आला आहे. तसंच अब्दुल अहद दररोज आम्हाला मालिश करायला सांगतात, तसंच घरी जाऊ देत नाहीत, घरातून कधी फोन आला तर कुटुंबाशी बोलायलाही देत नाही असे आरोप खेळाडू या व्हिडिओत करताना दिसत आहेत. 


प्रशिक्षकाचं काय म्हणणं?
या आरोपांबाबत क्रिकेट कोच अब्दुल अहद यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ऑगस्ट महिन्यात बॅडमिंटन खेळत असताना पडल्याने पाठिला दुखापत झाली. त्यामुळेच खेळाडूला मालिश करायला सांगितली. हा व्हिडिओ कोणी बनवला हे माहित नाही असं अब्दुल अहद यांनी सांगितलं. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो जिव्हा प्रशासनाच्या हाती लागला. याची गंभीर दखळ घेत जिल्हा प्रशासनाने क्रीडा उपसंचकांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसात आपला अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.