भारताच्या एका राज्यात आतापर्यंत तब्बल 800 हून अधिक विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यातल्या 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरामधू (Tripura) न ही चिंताजनक बातमी समोर आली आहे. त्रिपुरा राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकिय तपासणीत आतापर्यंत 828 विद्यार्थी एचआयव्ही संक्रमित असल्याचं निष्पन्न झाले आहेत. या जीवघेण्या आजाराने आतापर्यंत 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी देशभरातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये अभ्यास करण्यासाठी गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीने राज्यातील 220 शाळा आणि 24 कॉलेज-विद्यापिठातील विद्यार्थ्यांची ओळख पटवली असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 220 शाळा आणि 24 कॉलेज-विद्यापिठातील जे विद्यार्थी एड्सग्रस्त आढळले आहेत. त्या विद्यार्थ्यांना नसांमध्ये इंजेक्शन टोचून नशा करण्याचं व्यसन जडलं आहे. संपूर्ण राज्यातील आरोग्य संस्थांमधून याचा डेटा गोळा केला जात आहे.


अनेक मुलं ही सदन कुटुंबातील आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे आई-वडिल हे सरकार नोकर आहेत. पालकांकडून मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत असल्याने मुलांवर नियंत्रण राहिलेलं नाही. ज्यावेळी पालकांना आपली मुलं एड्सग्रस्त आहेत हे कळलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 


संक्रमणाचं मुख्य कारण सूई शेअर करणं
एचआयव्ही/एड्स ही एक महत्त्वाची जागतिक आरोग्य समस्या आहे, याचा थेट संबंध इंट्राव्हेनस ड्रग्सच्या गैरवापराशी आहे. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची एकच सूई अनेकांनी वापरल्याने एचआयव्ही प्रसाराची जास्त शक्यता आहे. ज्यामुळे विषाणू एड्सग्रस्त व्यक्तीच्या शरिरातून रक्ताद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचू शकतं. त्रिपुरामध्ये शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये नशेचं व्यसन मोठ्या प्रमाणावर पसरल्याने एड्सचं प्रमाणही वाढलं आहे.