मुंबई : बऱ्याचदा दुपारच्या जेवणानंतर आपल्याला झोपण्याची समस्या उद्भवते. आपल्याला झोपण्याची इच्छा नसते. परंतु शरीर इतकं सुस्तावतं की, दुसरं काहीचं करावंस वाटत नाही. अशावेळी आपण काम जरी करण्याचा प्रयत्न केला. तरी आपल्या हातून ते काम बरोबर होत नाही किंवा एखादी चूक तरी घडतेच. आधी हे सगळं ठिक होतं. कारण कोव्हिडमुळे सगळेच लोक वर्क फ्रॉम होम काम करत होते. परंतु आता ऑफिसमधून काम करताना अशी मध्येच झोप आली तर मात्र खैर नाही. कारण जर तुम्हाला झोपताना तुमच्या बॉसने पाहिलं तर मग सगळं संपलंच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला माहितीय का? की अशी दुपारी झोप येण्यामागचं कारण आहे तुमचं जेवण. ज्यामुळे तुम्हाला सुस्तावल्या सारखे वाटते. त्यामुळे अशा वेळी दुपारच्या जेवणात कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणते पदार्थ टाळावेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


दुपारच्या जेवणात हे पदार्थ टाळा:


द स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, दुपारच्या जेवणात प्रथिने आणि कार्ब्स सारख्या गोष्टी खाल्ल्याने झोप येते. जसे की,


- चीज
- तांदूळ
- गोड
- जास्त मीठचे अन्न
- सी फूड इ.


दुपारच्या जेवणात कोणते पदार्थ खावेत?


ऑफिसमध्ये जेवण करताना खालील गोष्टी खाव्यात. जेणेकरून अन्न खाल्ल्यानंतर झोप येत नाही आणि चांगले काम करता येते.


- वाफवलेल्या भाज्या
- भाकरी
- हंगामी फळे
- दही
- मसूर किंवा बीन्स
- मोड आलेले धान्य इ.


जेवल्यानंतर येणारी झोप कशी टाळायची?


दुपारचे जेवण खाल्ल्यानंतर येणारी झोप टाळायची असेल, तर या हेल्थ टिप्स नक्की फॉलो करा.


- थोडे थोडे खा. पोट भर जेवण करु नका
- दुपारच्या जेवणानंतर, थोडेसे चालत जा किंवा पायऱ्या चढा.
- कधीकधी च्युइंगम चघळता येते.
- पुरेसे पाणी प्या.
- दुपारच्या जेवणात मिठाई किंवा गोड खाणे टाळावे.
- भाताऐवजी चपाती खा.