नवी दिल्ली : कोरोनाची लागण झालेल्या महिलेने एका सुदृढ बाळाला जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. प्रसूती झालेली महिला ही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या रहिवासी डॉक्टरांच्या पत्नी आहे. शुक्रवारी कोरोनाग्रस्त महिलेने मुलाला जन्म दिला आहे. हे बाळ आता अतिशय सुदृढ असून सगळ्यागोष्टी अतिशय नॉर्मल सुरू आहोत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूवारी या नऊ महिन्याच्या गरोदर स्त्रीला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं. यानंतर तिच्या डॉक्टर पतीची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये त्यांना देखील COVID-19 ची लागण झाल आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टरच्या भावाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. 



एआयआयएमएसच्या प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. निरजा भाटला यांनी या महिलेची प्रसूती केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी या महिलेची सिझेरिअनने प्रसुती करण्यात आली. ठरलेल्या वेळेनुसार एक आठवडा अगोदर या महिलेची प्रसुती करण्यात आली.


गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे कुटुंबात भीतीचं वातावरण होत. मात्र प्रसुतीनंतर बाळाची चाचणी केल्यावर कोरोनाची लागण न झाल्याच समजलं. कोरोनाने देशभरात आपलं जाळ पसरलं आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या जाळ्यात कोरोनाने खेचलं आहे.