कर्नाटक सत्ता संघर्ष : १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी
कर्नाटकमध्ये १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
बंगळुरु : कर्नाटकमध्ये १० बंडखोर आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. बंडखोर आमदारांनी गुरुवारी रात्री विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत. मात्र, अद्यापही अध्यक्षांनी राजीनामे स्वीकारलेले नाहीत. अध्यक्षांनी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. आता अध्यक्षांच्या आणि आमदारांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत परिस्थिती जैसे थे राहणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना वेळ मिळणार आहे.
दरम्यान कर्नाटकातले बंडखोर आमदार पवईमधल्या हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. काल विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांना भेटून पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाले आहेत. ज्या ठिकाणी कर्नाटकातील बंडखोर आमदार आहेत, तेथील हॉटेलच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. तसेच या आमदारांनी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.