जगाच्या नकाशावरून नाहीसा होणार 'हा' देश; वेगाने समुद्रात बुडत चाललाय!

पॅसिफिक महासागर आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक सुंदर पॉलिनेशियन बेटांचा देश आहे. या बेटावर साधारण 11 हजार लोक राहतात.

| Nov 10, 2024, 18:35 PM IST

Tuvalu sinking into the ocean:पॅसिफिक महासागर आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक सुंदर पॉलिनेशियन बेटांचा देश आहे. या बेटावर साधारण 11 हजार लोक राहतात.

1/9

जगाच्या नकाशावरून नाहीसा होणार 'हा' देश; वेगाने समुद्रात बुडत चाललाय!

Smallest countries in the world Tuvalu sinking into the ocean

Tuvalu sinking into the ocean:पॅसिफिक महासागर आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक सुंदर पॉलिनेशियन बेटांचा देश आहे. या बेटावर साधारण 11 हजार लोक राहतात. इथे राहणाऱ्या लोकांकडे जास्त वेळ नाही. कारण त्यांचा देश समुद्रात बुडण्याच्या मार्गावर आहे.

2/9

9 लहान बेटांनी बनलेला देश

Smallest countries in the world Tuvalu sinking into the ocean

हा देश 9 लहान बेटांनी बनलेला आहे. या बेटाचे नाव तुवालू आहे. तुवालू हे तीन रीफ बेट आणि सहा प्रवाळांनी बनलेले आहे. तुवालुचे एकूण क्षेत्रफळ २६ चौरस किलोमीटर आहे. 

3/9

तिसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश

Smallest countries in the world Tuvalu sinking into the ocean

हा जगातील तिसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला सार्वभौम देश आहे. यापेक्षा कमी लोकसंख्या असलेले एकमेव देश म्हणजे व्हॅटिकन आणि नौरू.

4/9

लोकसंख्या अंदाजे 11 हजार इतकी

Smallest countries in the world Tuvalu sinking into the ocean

2017 च्या जनगणनेनुसार, तुवालुची लोकसंख्या अंदाजे 11 हजार इतकी आहे. ज्यामुळे तो व्हॅटिकन सिटीनंतर जगातील दुसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश बनला.

5/9

तुवालुचे पहिले रहिवासी

Smallest countries in the world Tuvalu sinking into the ocean

पॉलिनेशियन हे तुवालुचे पहिले रहिवासी होते. जे सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पॅसिफिकमध्ये पॉलिनेशियन लोकांच्या स्थलांतराचा भाग म्हणून आले. व्हॅटिकन सिटी (0.44 चौ. किमी), मोनॅको (1.95 चौ. किमी) आणि नाउरू (21 वर्ग किमी) लहान आहेत.

6/9

तुवालू एकेकाळी होते ब्रिटीश साम्राज्यात

Smallest countries in the world Tuvalu sinking into the ocean

हा द्विपांचा देश 19व्या शतकाच्या उत्तरार्धात युनायटेड किंग्डमच्या प्रभावाखाली आला होता. 1892 ते 1916 पर्यंत ते ब्रिटिश संरक्षित राज्य होते आणि 1916 ते 1974 दरम्यान ते गिल्बर्ट आणि एलिस आयलंड कॉलनीचा भाग होते. 1974 मध्ये स्थानिक रहिवाशांनी स्वतंत्र ब्रिटिश आश्रित प्रदेश म्हणून राहण्याच्या बाजुने मतदान केले. यानंतर 1978 मध्ये तुवालू संपूर्ण स्वतंत्र देश म्हणून कॉमनवेल्थचा भाग बनला.

7/9

राहणे खूप आव्हानात्मक

Smallest countries in the world Tuvalu sinking into the ocean

हा देश समुद्राच्या मध्यभागी असून आकाशाप्रमाणे खूप सुंदर दिसतो. मात्र येथील जनतेसमोर अनेक आव्हाने आहेत. इथली जमिन समुद्राखाली जाऊ लागली आहे. येथे पिण्याच्या पाण्याचीही समस्या आहे. 

8/9

पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर अवलंबून

Smallest countries in the world Tuvalu sinking into the ocean

तुवालुवासी भाजीपाला पिकवण्यासाठी पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर अवलंबून असतात. कारण खाऱ्या पाण्यामुळे भूजल संपुष्टात आले आहे. ज्यामुळे पिकांवर परिणाम होतोय. त्यामुळे शेती करणेही कठीण झालंय.

9/9

भिंत बनवायचे काम सुरु

Smallest countries in the world Tuvalu sinking into the ocean

समुद्रात बुडण्यापूर्वी वेळ विकत घेण्याचा प्रयत्न तुवालू करत आहे. फुनाफुटीवरील वादळाच्या तीव्रतेपासून संरक्षण करण्यासाठी समुद्राच्या भिंती आणि अडथळे बांधले जात आहेत. तुवालूने 17.3 एकर कृत्रिम जमीन तयार केली आहे. ते आणखी कृत्रिम जमीन तयार करण्याची योजना आखत आहेत. जी 2100 पर्यंत उच्च भरतीच्यावर राहील अशी आशा त्यांना आहे.