मुंबई : सध्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढत आहे. या समस्येमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने आपले प्राण गमावलेल्या अशा अनेक लोकांबद्दल तुम्ही देखील ऐकले असेल. बऱ्याच वेळा लोकांना वाचवले जाते, परंतु तुम्ही हे लक्षात घेतले असेल की, लोकांना अनेकदा बाथरूममध्येच हृदयविकाराचा झटका येतो. अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यात हृदयविकाराचा झटका हा बाथरूममध्येच येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु, असे का घडते आणि बाथरूममध्ये हृदयविकाराचा धोका जास्त का असतो याचा आपण कधी विचार केला आहे का? तर या बद्दल काही माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.


अशा परिस्थितीत तुम्ही बाथरूममध्ये काही गोष्टींचीही काळजी घ्यावी, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.


यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या अहवालात असेही म्हटले आहे की, हृदयविकाराच्या घटनेपैकी 11 टक्के हृदयविकाराचा झटका हा बाथरूममध्ये येतो.


परंतु असे का होते?


हृदय रोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक कारणे आहेत. त्यात ज्या लोकांना आधीच हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांना याचा जास्त धोका असतो. जेव्हा लोक बद्धकोष्ठतेची तक्रार करतात आणि पोट साफ करण्यासाठी जास्त ताण देतात. तेव्हा त्यांच्या हृदयावर ताण येतो.


त्यामुळे यावेळी हृदयविकाराचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत, हृदयाच्या त्रास असलेल्या रुग्णांना जास्त दबाव न घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. त्याचबरोबर बद्धकोष्ठता इत्यादीची समस्या असल्यास औषधे घ्या.


या व्यतिरिक्त तज्ज्ञांचे असे देखील मत आहे की, 'जास्त गरम किंवा जास्त थंड पाण्याने आंघोळ केल्याने देखील हृदयविकाराचा धोका वाढतो. उदाहरणार्थ, थंड हवामानात, जास्त थंड पाण्यामुळे आणि उन्हाळ्यात जास्त गरम पाणी वापरल्याने अशी समस्या उद्भवू शकते.


याशिवाय तुम्ही अंघोळ करताना खूप वेगाने किंवा घाई घाईने अंघोळ केली तर, हृदयविकाराचा ताण वाढतो अशा परिस्थितीत तापमानानुसार पाण्याचा वापर करुन आरामदायी स्नान करावे. ज्या लोकांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी अधिक काळजी घ्या आणि घाईत अंघोळ करु नका, त्याचप्रमाणे अंघोळीच्या खोलीत हवा खेळती राहील अशी व्यवस्था करा.