नवी दिल्ली : उत्तर भारतातील बर्‍याच राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे येत्या दोन दिवसांत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. या राज्यांच्या काही भागात मुसळधार आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज देशाची राजधानी दिल्लीत 21 जुलै रोजी दिवसभर ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर थंड वारे वाहतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणा आणि आसपासच्या भागात पाऊस


हवामान खात्याने हरियाणा व आजुबाजुच्या परिसरात पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज 21 जुलै रोजी करनाल, हिसार, जिंद, नरवाना, पानीपत, कुरुक्षेत्र आणि आसपासच्या भागात 20-40 किमी प्रतितास वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे.



यूपीमध्ये पाऊस


उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा हवामान खात्याने (आयएमडी) दिला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, येत्या काही तासांत नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, मेरठ, बिजनौर, चांदपूर, मुरादाबाद आणि आसपासच्या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रात या भागात पावसाची शक्यता


हवामान खात्याने येत्या काही तासांत मुंबईच्या बर्‍याच भागात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद आणि ओसाबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्रातील मराठवाडा आणि कोकण भागांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.


उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता.


उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचे संकट वाढत आहे. चमोलीतील पिपाळकोटी येथे एनएच -58 वर मातीचा ढिगारा आल्याने दोन बाईक व एक सूमोची धडक झाली. मात्र, कोणीही जखमी झालेलं नाही. भूस्खलनानंतर एनएच -58 वर वाहतुक कोंडी झाली होती. भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्गही बंद आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम येथे मदतकार्य करत आहे.


उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील बर्‍याच भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या हवामान खात्याने मुसळधार पावसासह रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, पिथौरागड आणि बागेश्वर येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.



बिहारमध्ये नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा


 


सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यानंतर बिहारमध्ये पुराचा धोका वाढला आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे कोसी बॅरेजच्या 56 पैकी 48 दरवाजे उघडण्यात आले आहेत. बॅरेज कंट्रोल रूमनुसार मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत कोसी बॅरेजमधून 3,40,380 क्युसेक पाणी सोडले जात आहे. पूर प्रशासनाने धोकादायक पातळी ओलांडल्यामुळे किनारपट्टीच्या भागात जागरुक राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. पश्चिम चंपारणमधील सिक्ता येथील त्रिवेणी कालव्याच्या उत्तरेकडे पूर आला आहे, तर सोन नदीवरील चाचरी (बांबूपासून बनलेला) पूल वाहून गेला.



हिमाचल प्रदेशात हवामान खात्याचा इशारा


 


हिमाचल प्रदेशमधील हवामान खात्याने (आयएमडी अलर्ट) मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. 22 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उना, बिलासपूर, हमीरपूर, कांगड़ा, शिमला आणि सिरमौर येथे पावसाचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे.


या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज


स्कायमेटने सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, बिहार येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पावसाची शक्यता आहे. दिल्ली, दक्षिण छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या उत्तरेकडील भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.