Heavy rain in Bengaluru : कर्नाटक राज्यात बंगळुरु येथे मेघगर्जनेसह आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. कँपागौडा विमानतळ परिसरात पाणी भरले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रवाशांची आपले सामान हलविण्यासाठी धावपळ उडाली. तसेच या पावसामुळे विमानसेवेवर काही काळ परिणाम झाला. आजही हवामान अंशतः ढगाळ असून आकाशात ढग दिसून येत आहे. शहरात ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


 मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे विमान सेवेवर परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुमध्ये जोरदार पाऊस झाल्याने याचा परिणाम विमानसेवेवर झाला. मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे कँपागौडाआंतरराष्ट्रीय विमानतळावरील 14 उड्डाणे वळवण्यात आली आणि सहा उड्डाणांना विलंब झाला. एका विमानतळ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट यामुळे फ्लाइट ऑपरेशनवर परिणाम झाला. काल संध्याकाळी गडगडाटास वादळी पाऊस झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे आकाश ढगांने आच्छादनामुळे एका तासासाठी विमान उड्डाण आणि सामान्य कामकाजात व्यत्यय आला. 14 उड्डाणे वळवण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली.



उन्हाळ्याच्या उष्णता जाणवत असताना अवकाळी  पाऊस झाल्याने बंगळुरूमध्ये सोमवारी रात्री काही ठिकाणी थंड वातावरण होते. तर काही ठिकाणी पाऊस पडला. तरीही, हवामान केंद्राच्या हवामान अंदाजानुसार, शहराला काही भागांमध्ये  हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


महाराष्ट्रात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा


Maharashtra Rain : ऐन उन्हाळ्यात राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. 7 ते 9 एप्रिल दरम्यान हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केलाय.  या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर शुक्रवार आणि शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.  या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.