दिल्लीत स्वातंत्र्य दिनासाठी कडेकोट सुरक्षा, कमांडो व स्नायपर्स तैनात
स्वातंत्र्यदिनासाठी विशेष सुरक्षा चक्र तैनात करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे बरोबर ४८ तास आधी म्हणजे आज पहाटे पासून नवी दिल्ली परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी लष्कर, वायूसेना आणि नौदलाच्या जवानांची आकर्षक परेड बघयाला मिळाली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज सकाळपासून मोठ्याप्रमाणात सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.
मूळ कार्यक्रमाला ज्यांना प्रवेश मिळत नाही, त्या सर्वांना या कार्यक्रमाला येऊन स्वातंत्रदिनाच्या सोहळ्याची भव्यता अनुभवता येते. स्वातंत्र्यदिनासाठी विशेष सुरक्षा चक्र तैनात करण्यात आले आहे. लाल किल्ला पसर, वर्दळीच्या बाजारपेठा, हॉटेल, मॉल, इंडिया गेट, बस स्थानक परिसरात सुरक्षेची कडेकोट काळजी घेण्यात आली आहे. लाल किल्ला परिसरात स्नायपर्स तैनात करण्यात आले असून ड्रोन आणि पतंगानाही बंदी घालण्यात आलीय. सुरक्षेसाठी एनएसजी कंमाडोही तैनात करण्यात आले आहे.