पुणे : सैन्य दलातील अधिकाऱ्यांसाठीही आता एक हेल्पलाईन सुरु झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थात ती हेल्पलाईन आहे अधिकाऱ्यांचे पगार, पेन्शन अशा तत्सम गोष्टीसंबंधीची माहिती देण्यासाठी... त्याचप्रमाणे यासंबंधीत त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी...


'इंटरॅक्टीव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टिम' स्वरूपाची ही यंत्रणा असून तिला डेफोडिल्स असं संबोधण्यात आलंय. 


'प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाऊंट्स' या विभागानं विकसित केलेल्या या यंत्रणेचं उदघाटन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हस्ते पुण्यात झालं. 


लष्करातील अधिकाऱ्यांच्या देणीबाबतचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.