मध्य प्रदेश : भोपाळच्या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. तुझा सर्वनाश होईल असे मी करकरेंना सांगितल्याचे प्रज्ञा म्हणाल्या आहेत. भोपाळमधून निवडणूक लढवत असलेल्या प्रज्ञा यांनी गुरूवारी पहिल्यांदा मीडियाशी बातचित केली. पण आता त्यांचे धक्कादायक वक्तव्य बाहेर आले आहे. हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने फसवले असा आरोप त्यांनी करकरेंवर केला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साध्वी प्रज्ञा या मुंबईतील तुरूंगात होत्या. यावेळी पुरावे नसतील तर साध्वी प्रज्ञा यांना सोडण्याबद्दल शोध पथकाने सांगितले. पण हेमंत करकरे हे आपल्या भुमिकेवर ठाम राहीले. मी कुठुनही पुरावे आणेन पण कोणत्याही परिस्थितीत साध्वी प्रज्ञाला सोडणार नाही असे हेमंत करकरेंनी म्हटले होते. यावेळी तुझा सर्वनाश होईल असा शाप साध्वींनी हेमंत करकरेंना दिला. जेव्हा मी गेले तेव्हा सुतक लागले आणि ज्या दिवशी करकरेंना दहशतवाद्यांनी मारले तेव्हा सुतक संपले असे खळबळजनक विधान साध्वी प्रज्ञा यांनी केले. 



शहीद हेमंतर करकरे यांच्याकडे मालेगाव बॉम्बस्फोटाचा शोध सुरू होता. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा या मुख्य आरोपी होत्या. हेमंत करकरे यांनी दाखल केलेल्या चार्जशीटवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 26 नोव्हेंबर 2009 ला शहीद झालेल्या करकरेंना भारत सरकारने मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित केले.