मुंबई : इलेक्ट्रिक दुचाकींची बाजारपेठेत तीव्र स्पर्धा असून, ती वाढत आहे. दररोज नवनवीन स्टार्ट-अप्स त्यांच्या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकल्स घेऊन येत आहेत.  Hero MotoCorp नेदेखील भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर समोर आणली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hero ने बेंगळुरू स्थित Log 9 Materials सोबत भागीदारी केली आहे. हे स्टार्टअप हीरोच्या सर्व इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी पॅक बसवणार आहे. Log9 ची RapidX बॅटरी बसवल्यानंतर हिरो इलेक्ट्रिक दुचाकी 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतात. हिरोने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, Log9 ने बॅटरी तयार करण्यासाठी सेल-टू-पॅक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.


बॅटरी चार्जिंग 9 पट जलद


कंपनीचा दावा आहे, की बॅटरीचे चार्जिंग 9 पट वेगाने होईल, तिची कार्यक्षमता देखील 9 पटीने वाढेल. बॅटरीचे आयुष्य देखील 9 पट होईल. Log9 ने Amazon, Shadowfax, Delivery, Flipkart आणि Bikemania यांसारख्या फ्लीट ऑपरेटर्ससोबत पायलट प्रोजेक्ट म्हणून RapidX बॅटरीची चाचणी केली आहे.


या बॅटरीचे आयुष्य 10 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ती खूप चांगली आहे कारण या बॅटरीला आग लागत नाही. तापमान खूप वाढले तरी या बॅटरीजमध्ये फरक पडत नाही, याशिवाय कंपनीने या बॅटरीची वेगवेगळ्या सीझननुसार चाचणी केली आहे.


सध्या व्यावसायिक वापरासाठी


हिरो इलेक्ट्रिक भारतीय बाजारात NYX इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहे. ही स्कूटर सध्या व्यावसायिक वापरासाठी विकली जात असून सिंगल चार्जवर ती 210 किमी चालवता येते. या ई-स्कूटरचे अनेक प्रकार बाजारात विकले जात आहेत आणि विशेषत: फूड डिलिव्हरी कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.


हिरो इलेक्ट्रिकचे म्हणणे आहे की, कंपन्या त्यांच्या गरजेनुसार इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बदल करू शकतात, ज्यामध्ये समोर एक बादली आणि मागे एक मोठा बॉक्स असेल.


इलेक्ट्रिक मोटर पर्याय


स्कूटर 600 किंवा 1300 वॅटच्या इलेक्ट्रिक मोटर्सच्या निवडीसह येते जी प्रत्येकी 51.2 वॅट किंवा 30 AH च्या तीन लिथियम-आयन बॅटरीसह येतात. हीरो इलेक्ट्रिकच्या या स्कूटरमध्ये स्कूटर डायग्नोस्टिक सोल्यूशन्सशिवाय स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि सर्वोत्तम रिमोट सर्व्हिलन्स यासारखी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.


ही ई-स्कूटर तीन प्रकारांमध्ये सादर केली गेली आहे - LI, LI ER आणि HS500 ER ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत दिल्लीमध्ये 63,900 रुपये आहे, ही किंमत टॉप मॉडेलसाठी 79,900 रुपयांपर्यंत जाते.