मुंबई : सणासुदीच्या काळात 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. यावर्षी बाजाराने चांगली तेजी नोंदवली आहे. अशामध्ये चांगले फंडामेंटल असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून दमदार परतावा मिळवू शकता. असाच एक शेअर ब्रोकरेज हाऊस ICICI Securities ने सुचवला आहे. HFCL या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला असून मागील एका वर्षात या शेअरने 350 टक्के रिटर्न दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हायवॅल्युएशनच्या मार्केटमध्ये चांगला पर्याय
यावेळी भारतीय शेअर बाजाराचे वॅल्युएशन खुपच जास्त आहे. अशातच अनेक शेअर महाग झाले आहेत. परंतु चांगले फंडामेटल असलेल्या परंतु स्वस्त शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज हाऊसने HFCL हा शेअर सुचवला असून  शेअरची सध्याच्या स्तरावर खरेदी करून 92 रुपयांचे लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


ब्रोकरेज हाऊस ICICI Securities च्या रिपोर्टनुसार कंपनीच्या व्यवसायाची प्रगती चांगली आहे. येत्या काळातही कंपनीच्या व्यवसायाला बुस्ट मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये ऑप्टिकल फायबर केबल्स, टेलिकॉम ऍंड नेटवर्किंग, डिफेंस रेल्वे आणि सिक्युरिटी ऍंड सर्विलांस सेंगमेंट सामिल आहे. कंपनीचा रेवेन्यु ग्रोथ 15 ते 20 टक्के कायम आहे.