जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवादी घुसल्याची माहिती, हाय अलर्ट जारी
पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यातच आता नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यातच आता नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीमधून सुमारे २० दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केल्याची माहिती आहे.
दरम्यान, जहाल दहशतवादी मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती आहे. या दहशतवाद्यांकडून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून काश्मीर घोरे टार्गेटवर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आलाय.
जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच राज्यातील संवेदनशील भागांमध्ये कडक पाहारा ठेवण्यास सांगण्यात आले आहे.