श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खराब हवामानामुळे घुसखोरी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बालाकोट भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्याप्रमात बर्फवृष्टीसुरु आहे. बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच खराब हवामानाचा फायदा घुसघोर घेऊ शकतात. लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी निसार डारला अटक करण्यात आली असून जम्मू-काश्मीरममध्ये सुरक्षादलाला मोठं यश आलंय. याआधी झालेल्या एनकाऊंटरमध्ये सुरक्षारक्षकांना चकवून निसारने पळ काढला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या चकमकीत अखेर निसारला पकडण्यात सुरक्षादलांना यश आलं आहे. 



मंगळवारी मध्यरात्रीपासून काश्मीरमधील सर्व भागात एसएमएस सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यासोबतच शाळा, कॉलेज आणि रुग्णालयातही इंटरनेट सेवा सुरु केली आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर लँडलाईन, इंटरनेट आणि एसएमएस सुविधा बंद करण्यात आली होती. त्यात सुरक्षेच्या कारणास्तव इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली होती, मात्र आता जनजीवन पुर्ववत होत असताना इंटरनेट सेवाही सुरु करण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील काही भागात लँडलाईन सेवा सुरु करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी सांगितलं की, मंगळवारी मध्यरात्री सरकारी शाळा, रुग्णालयात ब्राडबँड सेवा सुरु करण्यात आली आहे. मोबाईल सेवा सुरु करण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये याचं स्वागत होत असल्याचं ते म्हणाले.