नवी दिल्ली : गुजरात राज्यसभा निवडणुकीचा वाद अहमदाबादमधून आता थेट दिल्लीत पोहचलाय. काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदान केल्यानंतर ते भाजपच्या उमेदवाराला दाखवलं. त्यामुळं गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं ही दोन मतं बाद करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकार कॅमे-यात कैद झाला असून त्याचीही तपासणी सुरू आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. तर पराभव दिसत असल्यामुळंच काँग्रेस बिथरली असल्याचा आरोप भाजपनं केलाय.


भाजपच्याही बड्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतमोजणी सुरू करण्याची मागणी केलीय. काँग्रेसनं आक्षेप घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं मतमोजणी थांबवलीय. त्यामुळं निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे सा-या देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.