मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशीष कचौलिया यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक असा स्टॉक सामिल केला आहे की, ज्यामुळे आतापर्यंत परताव्याच्या बाबतीत मल्टिबॅगर (multibagger stocks) ठरला आहे. कचौलिया यांनी सप्टेंबर 2021 तिमाहीदरम्यान क्वॉलिटी फॉर्मास्युटिकल्स(Kwality Pharmaceuticals Ltd) मध्ये खरेदी केली आहे. कचौलिया यांनी साधारण 1.4 टक्के शेअर सप्टेंबर तिमाहीच्या दरम्यान या कंपनीमध्ये खरेदी केले आहे. क्वॉलिटी फॉर्मास्युटिकल्स शेअर्समध्ये यावर्षी जानेवारीपासून ते आतापर्यंत गुंतवणूकदारांना 14 पट परतावा मिळाला आहे. याचा अर्थ जानेवारी मध्ये कोणी 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर, आज त्याची वॅल्यू 14 लाख रुपये झाली असती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कचौलिया यांनी Kwality Pharmaceuticals मध्ये हिस्सेदारी किती वाढवली
बीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या क्वॉलिटी फॉर्मास्युटिकल्सच्या सप्टेंबर 2021 च्या तिमाही शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार आशीष कचौलिया यांनी कंपनीच्या शेअर्समध्ये साधारण 1.4 टक्क्यांची गुंतवणूक केली आहे. कचौलिया यांनी शेअरमध्ये पहिल्यांदाच खरेदी केली आहे. 


एका वर्षात शेअरने दिला 1448 टक्के रिटर्न
क्वॉलिटी फॉर्मास्युटिकल्सचा शेअऱ गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. जानेवारी 2021 मध्ये  भाव 58 रुपये होता. तर आज या शेअर्सचा भाव 913 रुपयांवर ट्रेड करीत आहे.