मुंबई : पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखिमेचे काम असते. परंतू जर कंपनीचे फंडामेटल मजबूत असले किंवा बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग असले तर स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देण्याची क्षमता ठेवतो. असाच एक स्टॉक म्हणजेच Simplex Papers होय. हा पेपर प्रोडक्टचा स्टॉक वर्षभरात 1 रुपयांनी वाढून 71 रुपयांवर पोहचला आहे. या अवधीत ज्या गुंतवणूकादारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना तब्बल 7000 टक्क्यांचा भरघोस परतावा मिळाला असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Simplex Papers च्या प्राइस हिस्ट्रीवर नजर टाकल्यास लक्षात येते की, मागील एका महिन्यात या शेअरमध्ये दबाव दिसून आला. म्हणजेच मागील महिन्यात कंपनीचे शेअरची गुंतवणूकदारांनी विक्री केली. गेल्या आठवड्यातही हा स्टॉक 14 टक्क्यांनी घसरला आहे. मागील महिन्यात या स्टॉकने आपला ऑल टाइम हाय म्हणजेच 122 रुपयांपर्यंत उसळी घेतली होती. गेल्या सहा महिन्यात या स्टॉकने 1500 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.


तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत हा स्टॉक 1 रुपयांवरून 71 रुपयांवर आला आहे. म्हणजेच वर्षभरात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 7000 टक्क्यांचा भरघोस परतावा दिला आहे.


मागील वर्षी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याला 71 हजार रुपये मिळाले असते. त्यामुळे हा स्टॉक वर्षभरात बक्कळ परतावा देणारा हाय रिटर्न स्टॉक ठरला आहे.