मुंबई : High Return Stocks: शेअर बाजारात एका शेअरची सर्वाधिक चर्चा आहे. 2021 मध्ये शेअर बाजारात या शेअरचीच चर्चा रंगली आहे. कोरोना साथीत शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स आज 52800 च्या वर व्यापार करीत आहे. शेअर बाजारामध्ये असे काही समभाग आहेत ज्यांनी या दरम्यान त्यांच्या गुंतवणूकदारांना कमाई केली. यात आदित्य व्हिजन लिमिटेड या  कंपनीचा (Aditya Vision Limited) एक शेअर आहे.


Aditya Visionच्या शेअरने केले मालामाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरकोळ ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या आदित्य व्हिजन लिमिटेडने गेल्या वर्षातही मोठा परतावा दिला आहे. आजही या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून येत आहे. गेल्या एका वर्षाचा आलेख पाहिला तर या कंपनीचा ग्राफ पाहिला तर कायम उच्च परतावा दिला आहे. जुलै 2020 मध्ये हा शेअर 20.60 रुपये होता, तर आज त्याची किंमत प्रति शेअर 595 रुपये आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात 2800 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. गेल्या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर 31 मे रोजी कंपनीचा शेअर 391.55 रुपये होता, आणि आज तो 595 रुपयांवर आहे, म्हणजेच कंपनीच्या स्टॉकने महिन्यात 52 टक्के परतावा दिला आहे.


1 लाख रुपयांचे झाले 30 लाख रुपये 


जुलै 2020 मध्ये या कंपनीत एखाद्याने 50,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य 14.87 लाख रुपये झालेले असेल. जुलै 2020 मध्ये कंपनीचा शेअर 20.60 रुपये होता, आज तो 595 रुपयांच्या वर व्यवहार करीत आहे. म्हणजेच, एका वर्षाच्या आत, शेअर किंमतीत 2800 टक्क्यांनी वाढ झाली. जुलै 2020 मध्ये आपण 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ही रक्कम सुमारे 30 लाख रुपये असते. गेल्या एका वर्षात सेन्सेक्सने 51 टक्के परतावा दिला आहे.


कंपनी काय करते


आदित्य व्हिजन लिमिटेड किरकोळ ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, गृह उपकरणे, कॅमेरे आणि मोबाईलच्या व्यवसायात आहे. ही कंपनी एक मल्टी-ब्रँड, मल्टी-प्रॉडक्ट रिटेल चेन आहे, ज्यामध्ये ग्राहक टिकाऊ वस्तू, वातानुकूलन, दूरदर्शन, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह आणि रेफ्रिजरेटर आहेत. कंपनी  घरातील उपकरणे, होम थिएटर सिस्टम आणि मोबाईलची विक्री देखील करते. कंपनीने एप्रिलमध्ये बीएसईला त्याच्या विस्तार योजनांबद्दल माहिती दिली होती. बिहारमध्ये कंपनीचा विस्तार होत आहे.


लक्षात ठेवा, झी 24 तास कोणत्याही स्टॉकमधील गुंतवणूकीबाबत सल्ला देत नाही. ही केवळ एक माहिती आहे. जी आपल्याला संशोधनातून पोहोचविली जात आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या सल्लागारांच्या सल्ल्यावरच तुम्ही गुंतवणुकीबाबत कोणताही निर्णय घ्यावा.