देशात झपाट्याने वाढू लागली Omicron ची प्रकरणं, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
ओमायक्रॉनची प्रकरणं देशात वाढू लागली आहेत. त्यामुळे सरकार आता कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करत आहे.
मुंबई : देशात ओमायक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आतापर्यंत 1300 हून अधिक प्रकरणांची पुष्टी झाली आहे. ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात नोंदवली गेली आहेत. केरळमध्येही ओमायक्रॉनचे 44 नवीन रुग्ण आढळले आहेत. (Highest Omicron cases in maharashtra)
अधिक माहिती देताना केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या नवीन प्रकाराची 107 प्रकरणे आढळली आली आहेत.' शुक्रवारी कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनची 23 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ सुधाकर यांनी या नवीन प्रकरणांना दुजोरा दिला आहे. त्यापैकी 19 आंतरराष्ट्रीय प्रवासी अमेरिका, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील आहेत.
ओमायक्रॉनच्या वाढत्या घटनांमुळे देशातील बहुतेक शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात ओमायक्रॉनची (Maharashtra Omicron Cases) 450 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. Omicron प्रकरणे नोंदवलेल्या 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी महाराष्ट्र 450 प्रकरणांसह अव्वल स्थानावर आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार त्यापैकी 125 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिल्लीत ओमायक्रॉनचे 320 रुग्ण
दिल्लीत नवीन प्रकाराचे 320 रुग्ण आढळले आहेत. देशातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्र आणि दिल्लीत 870 रुग्ण आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनची 198 प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यापैकी 190 प्रकरणे एकट्या मुंबईतील आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी सांगितले की, कोरोनाचा नवीन प्रकार आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे.