मुंबई : इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. राज्यात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत असून पेट्रोल प्रति लिटर 93.69 रुपये तर मुंबईत पेट्रोलचे दर 91.32 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध शहरातील दर


दिल्लीत आज 15 जानेवारीला पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल आज प्रति लिटर 84.70 रुपये आणि डिझेल 74.88 रुपये दराने विकले जात आहे.


मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 91.32 रुपये आणि डिझेलचे दर 81.60 रुपये आहेत.


कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 86.15 रुपये आणि डिझेलची किंमत प्रतिलिटर 78.47 रुपये आहे.


चेन्नईमध्येही पेट्रोल 87.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 80.19 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.


बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 87.56 रुपये आणि डिझेलचे दर 79.40 रुपये प्रति लिटर आहेत.


पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अद्यतनित केले जातात. आपल्याला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर कळू शकतात. इंडियन ऑईल ग्राहक RSP टाईप करुन शहराचा पिनकोड 9292992249 या नंबरवर पाठवून माहिती मिळवू शकतात. बीपीसीएल ग्राहक RSP टाईप करुन 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात. एचपीसीएल ग्राहक HPPrice टाईप करुन 9222201122 या क्रमांकावर पाठवून दर माहिती करुन घेऊ शकतात. (How to check diesel petrol price daily)