मुंबई : नोकरी करण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीच्या मनात पहिला प्रश्न येतो पगाराचा. जे गरजेचे देखील आहे. कारण आपल्याला आयुष्य जगण्यासाठी गरज असते ती पैशांचीच आणि आपण काम करतो ते पैशासाठीच. आजच्या काळात लोकांच्या गरजा वाढल्या आहेत. त्याचप्रमाने सभोवतालातील गरजेच्या वस्तुंचे भाव देखील वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी जास्त पैसे मिळण्याची अपेक्षा करने सहाजिकच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु बऱ्याचदा तरुणांना करिअरच्य़ा सुरवातीला असा प्रश्न पडतो की, अशा कोणत्या नोकऱ्या आहेत ज्या त्यांना जास्त पैसे मिळवून देऊ शकतात? किंवा त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते? तर आम्ही अशा पाच नोकऱ्यांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामधून तुम्हाला जास्त पगार मिळण्याची शक्यता आहे आणि त्या तुम्ही कशा मिळवू शकता.


1. व्यवसाय विश्लेषण (Business Analytics)- ज्यांचे गणित चांगले आहे असे विद्यार्थी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहू शकतात. विशेषत: ज्यांची आकडेवारी आणि संभाव्यता यांसारख्या गोष्टींवर ताबा आहे, अशा लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे. डेटा आणि व्यवसाय विश्लेषणाचा कोर्स भारत आणि परदेशात तुम्ही करु शकता. याचे शिक्षण तुम्ही बारावी किंवा पदवीनंतर घेऊ शकता.


एका रिपोर्टनुसार या क्षेत्रात सुरुवातीचा म्हणजेच बेसीक पगार हा वर्षाला 6-8 लाखांदरम्यान आहे. तर काही काळाने हा 15 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जास्त अनुभवी लोकं 25 लाख किंवा त्याहून अधिक पगार देखील मिळवू शकतात.


2. गुंतवणूक बँकर्स (Investment Bankers) - मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक बँकर्सची मोठी मागणी आहे. वास्तविक, हे लोक कंपन्यांना भांडवल वाढवण्यात मदत करतात. ते टॉप मॅनेजमेंटला आर्थिक सल्ला देतात.


या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांकडे बिजनेस एडमिनिस्ट्रेशन  किंवा फायनान्स अभ्यास क्षेत्रात पदवी घेतलेली असावी. मीडिया रिपोर्टनुसार सुरुवातीच्या काळात यांना वार्षिक पगार 12 लाख रुपयांपर्यंत मिळतो. तसेच अनुभवी लोकं वर्षाला 50 लाखांपर्यंत कमावतात.


3. अ‍ॅप डेव्हलपर (App Developer) - आजच्या युगात, आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी अ‍ॅप्स उपलब्ध असतात. बातम्यांपासून ते ई-कॉमर्सपर्यंत सगळ्याच गोष्टीसाठी अ‍ॅप्सचा उपयोग होतो. ज्या कंपन्या अ‍ॅप लाँच करतात, त्यांना अ‍ॅप डेव्हलपरची आवश्यकता असते.


या क्षेत्रात जाण्यासाठी अ‍ॅप डेव्हलपमेंट कोर्स करावा लागतो. असे म्हटले जाते की, अ‍ॅप डेव्हलपरचा सुरवातीचा पगार हा वार्षिक 6-8 लाख आहे. तसेच अनुभवी लोकं वर्षाला 60 लाखांपर्यंत कमावतात.


4. चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant)- आजही चार्टर्ड अकाउंटंटची बाजारात मोठी मागणी आहे. चार्टर्ड अकाउंटंटहे कंपन्यांना कर व्यवस्थापन आणि फासनान्स व्यवस्थापनाबद्दल सल्ला देतात. या क्षेत्रात जाण्यासाठी सीएची परीक्षा पास करावी लागेल.


मीडिया रिपोर्टनुसार सीएचा प्रारंभिक पगार वार्षिक 5 लाख रुपये आहे. त्याचबरोबर अनुभवी लोकं वार्षिक 25 लाखांपर्यंत कमावतात.


5. सोशल मीडिया मॅनेजर (Social Media Manager)- इंटरनेटच्या युगात सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे शस्त्र बनले आहे. कंपन्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत सगळेच लोकं आपला सोशल मीडिया सांभाळण्यासाठी एक मॅनेजर ठेवतात.


या क्षेत्रात जाण्यासाठी, कम्युनीकेशनची पदवी घ्यावी लागेल. त्यासोबतच SMOचा कोर्सही करावा लागतो. असे म्हटले जाते की, या क्षेत्रातील लोकं वर्षाकाठी 4 ते 18 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात.