पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात (Accident Naval Bridge pune) झाल्यानंतर त्यात तब्बल 48 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. असे अपघात रोज आणि वारंवार अनेक ठिकाणी होताना आपण ऐकतो. ज्यात अनेक लोकांचा जीव देखील जातो. महामार्गावर असे अपघात वारंवार का होतात आणि ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, असा प्रश्न नेहमी उपस्थित होत आहे. असे अपघात टाळण्यासाठी (avoid accidents) खालील  गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तरीही एखादा अपघात झालाच तर तो तुमच्या चुकीने होणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेग नियंत्रित करा
तुम्ही हायवेवर गाडी चालवत असाल तर तुमच्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण (Vehicle speed control) ठेवा, आणीबाणीच्या वेळी ज्या वेगाने तुम्ही हाताळू शकता त्याच वेगाने वाहन चालवा. अनेक वेळा अतिवेग (high speed) आणि अतिआत्मविश्वासामुळे (Because of overconfidence) लोक मोठ्या अपघातांना आमंत्रण देतात. सुरक्षित प्रवासाचा आनंद लुटता यावा म्हणून महामार्गावर संवेदनशीलपणे वाहन चालवणे गरजेचं आहे.
 
आपल्या लेन मध्ये चालणे
तुम्ही तुमची गाडी हायवेवर घेऊन जाता, तेव्हा त्याच लेनमध्ये गाडी (Car in lane) चालवण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला लेन बदलायची असेल, तर मागून येणाऱ्या वाहनाला सिग्नल द्या (Signal the vehicle) आणि मागच्या आरशातून इतर वाहनांवरही लक्ष (Look at the vehicles from the mirror) ठेवा. एकूणच तुम्हाला तुमच्या लेनमध्ये गाडी चालवावी लागेल. तसेच, समोरून जाणा-या वाहनापासून योग्य अंतर राखा (Keep a proper distance from the vehicle), जेणेकरुन तुम्ही आपत्कालीन ब्रेकिंग (emergency braking) दरम्यान तुमचे वाहन नियंत्रित करू शकता.


जास्त विचार टाळा
लोक अनेकदा हायवेवर लांबचा प्रवास करतात, तर अनेक वेळा लोकांकडे इतका वेळ असतो की ते गाडी चालवताना काहीतरी विचार (Thinking while driving) करू लागतात. अनेक वेळा जास्त विचार केल्याने लोकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते (lose control vehicle), त्यामुळे मोठा अपघात (Big accident) होतो.


बीमलाइटचा योग्य करा
कारमध्ये हाय बीम लाइटचा (Car high beam light) वापर करावा. कारण महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर (highways  expressways) समोरून येणारी वाहने दुभाजकाच्या पलीकडे धावत असतात. अशा स्थितीत गाडी चालवताना इतर कार किंवा तुमच्या कारचा हाय बीम लाइट (Car high beam light) तुम्हाला किंवा इतर कोणालाही त्रास देत नाही. या गोष्टीचा योग्य वापर केला तर नक्कीच अपघात होण्याच प्रमाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही.