पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; काय आहे आजचा दर?
पेट्रोल-डिझेल दरवाढ...
नवी दिल्ली : पेट्रोलच्या किंमतीत रविवारी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत (Petrol Prices) ९ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत (Diesel Prices) १० पैशांची वाढ झाली आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर ७४.९५ रुपये प्रति लीटरवर पोहचला आहे. तर एक लीटर डिझेलचा दर ६५.९४ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोल जवळपास ८०.६० रुपये प्रति लीटर तर डिझेल ६९.१७ रुपये प्रति लीटर इतकं आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल ७७.६२ रुपये आणि डिझेल ६८.३५ रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत पेट्रोलच्या किंमती ७७.९२ रुपये आणि डिझेल ६९.७० रुपये इतक्या आहेत.
ऑइल मार्केटिंग कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करतात. कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या दरात पेट्रोलच्या किंमतीसह एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन जोडल्यानंतर याची किंमत जवळपास दुप्पट होते.
आपापल्या शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घरबसल्याही जाणून घेता येऊ शकतात. केवळ एका एसएमएसवर (SMS) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची माहिती मिळू शकते. सकाळी ६ वाजल्यानंतर ९२२४९ ९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत माहिती मिळू शकते.