नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सुविधा दिली आहे. दरम्यान मोबाईल मेसेजिंग प्लॅटफॉर्म हाइकने कोरोना रुगणांची वाढती संख्या पाहता डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. तर ज्या कर्मचाऱ्यांचं काम ऑफिसमध्ये आल्याशिवाय होवू शकत नाही  अशा कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावले आहे. शिवाय कंपनीने 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ४० हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरामदायक खूर्ची आणि टेबल देणार असल्याचं देखील कंपनीने म्हटले आहे. त्याचप्रमाणे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खूर्ची आणि टेबल विकत घेण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रूपये देण्यात येणार आहे. 


शिवाय कामासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी २५ हजार रूपये देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या इंटरनेटसाठी १ हजार ५०० रूपये देण्यात येणार आहे. कोरोना काळात मार्च महिन्यापासून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे.