रिल बनवण्याच्या नादात लोकं अनेक उपद्वाप करतात, हे काही नवीन नाही. एवढंच नव्हे तर एका रात्रीत लोकप्रिय होण्यासाठी अनेक इन्फ्लुएन्सर अशा पद्धतीचे रिल बनवतात. असाच एक हिमाचलमधील चंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी उंच डोंगरावर ओढणी घेऊन रिल बनवताना दिसत आहे. थोड लांबून एक व्यक्ती हा व्हिडीओ शूट करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमधील लोकप्रिय गाणं 'बेपना प्यार है' यावर ही तरुणी रिल बनवताना दिसत आहे. ओढणी हातात घेऊन हवेत उडवत हा व्हिडीओ बनवला जात आहे. या दरम्यान ती डोंगरावरुन खाली धावत येते अगदी सिनेमॅटिक पद्धतीने. तेव्हाच तिचा पाय घसरला आणि ती खोल दरीत पडली. हा सगळा प्रकार रिल बनवणाऱ्या व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झाला. धक्कादायक बाब म्हणजे ती खोल दरीत घरंगळत खाली जाताना या व्हिडीओत दिसत आहे. 


हिमाचल प्रदेशातील हिरवेगार दऱ्या आणि पर्वत कंटेंट निर्मात्यांना खूप आवडतात, परंतु अनेक वेळा पर्वतांवर रील बनवताना लोक आपल्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. अशीच एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चंबा येथील असल्याचे सांगितले जात आहे.



चुकीच्या कारणामुळे का होईना पण हा व्हिडीओ इंटरनेटवर झटपट्याने व्हायरल होत आहे. भितीदायक असा हा व्हिडीओ असून यामध्ये कोसळलेली ही मुलगी सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. या डोंगरावर सगळीकडे गवताचे मळे होते. या मळ्यांमुळे तरुणी वाचली असल्याच सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.


आता लोक या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत. दीक्षा शर्मा नावाच्या युजरने कमेंट बॉक्समध्ये विचारले की, तो जिवंत आहे का? सुरेंद्र कुमारने यावर उत्तर दिलं आहे की, तिचं काय? तिला काय होणार आहे. कशाला तिची चिंता करायची. 
कविता सिंह नावाच्या युजरने लिहिले, आणखी एक संधी मिळाली तर ती रीलच्या नावावर वाया घालवू नका. त्याचवेळी सोनाली संधूने लिहिले की, आजकाल लोक फॉलोअर्ससाठी काहीही करायला तयार असतात. तर सुरेश कुमार एसके यांनी रीलसाठी रिअल ऍक्शन लिहिले. त्याच वेळी, एका वापरकर्त्याने टाटा...बाय-बाय...फिनिश असे लिहिले.


अशा उंच टेकड्यांवर रील बनवल्यास काही युझर्सची पसंती देखील यामाध्यमातून मिळाली आहे. परंतु जोखीम खूप जास्त आहेत. थोडा जरी तोल गेला तरीही होत्याचं नव्हतं होऊ शकतं. त्यामुळे अशा ठिकाणी रील न बनवणे चांगले. रील बनवावी असे वाटत असेल तर सावधान.