Himachal Pradesh Opinion Poll 2022 : हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी (Himachal Pradesh Assembly election 2022) सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात 68 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. झी मीडियाने निवडणुआधी ओपिनियन पोल (himachal opinion poll 2022) घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचा मूड काय आहे हे समोर येत आहे. राज्यात 55.74 लाखांहून अधिक मतदार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओपिनियन पोलमध्ये (opinion poll 2022) कोणत्या जागेवर कोणाचे पारडे जड आहे हे आपण पाहणार आहोत. या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असणार आहे.  भाजपकडून जोरदार तयारी सुरु असून आपणच सत्तेत येणार असा दावा आहे. हिमाचल प्रदेशात 90 च्या दशकापासून कुठलाही पक्ष सलग दोन टर्म सत्तेत राहिलेला नाही. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 विधानसभा जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला 20 जागा मिळाल्या होत्या. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी 38.47 टक्के होती, जी 2017 मध्ये वाढून 48.8 टक्के झाली. राज्यातील मतांच्या प्रमाणात ही भाजपची सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर 2017 मध्ये काँग्रेसची मतांची टक्केवारी 42.81 वरून 41.7 टक्क्यांवर आली.


कोणाला किती जागा मिळणार?


ओपिनियन पोलनुसार हिमाचलमध्ये भाजपला 34 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 24 ते 28  जागा तर इतरांच्या खात्यात 2 जागा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर ओपिनियन पोल जर खरा ठरला तर हिमाचल प्रदेश भारतीय जनता पक्ष नवा इतिहास रचणार आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पहिल्यांदाच कोणताही पक्ष दोन वेळा सत्तेत येणार आहे.