शिमला : हिमाचल प्रदेशातील भाजपचे मोठे नेते हंस राज एका चॅटप्रकरणामुळे राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. यावेळी व्हाट्सअप चॅटचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत. त्यांनी एका महिलेला केलेल्या मॅसेजचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपनेते हंस राज यांनी एका महिलेला कामाच्या मोबदल्यात रात्री घरी बोलवण्यासंदर्भातील मॅसेजचा स्किनशॉट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. 


राज यांनीही हा आपली प्रतिमा हननाचा प्रयत्न असल्याचे म्हणत, चंबा येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अशा प्रकारचे प्रतिमा हननाचे काम करणाऱ्यांना चांगली अद्दल घडवू असेही राज यांनी म्हटलं आहे. 


हा स्क्रिनशॉट सर्वप्रथम कॉंग्रेसच्या चुराह यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला. या चॅटवरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. डीएसपी मयंक चौधरी यांनी म्हटले की, पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू आहे. 


हंस राज यांनी केलेल्या कथित चॅटमध्ये, 'कामाच्या बदल्यात रात्री येण्याचे म्हटले आहे'. 
कथित चॅटचा स्क्रिनशॉट
-



दरम्यान, हंस राज यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. चारित्र हनन करण्यासाठी विरोधकांकडून हे हातखंडे वापरण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं, तसेच याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. हा स्क्रिनशॉट राज यांचा असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, 'झी२४तास' त्याची पुष्टी करीत नाही.