शिमला / जम्मू : हिमाचल प्रदेशातील किन्नोर-तिबेट सीमेवर हिमस्खलन होऊन सहा जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. १६ जवान गस्त घालत होते त्यावेळी हिमस्खलन झाले. घटनास्थळी सैन्यदल, पोलिसांचे मिळून १५० जणांचे पथक बचावकार्य करत आहे. तसेच एक चारचाकी वाहनही वाहून गेले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पंचारीमध्ये सतत पाऊस पडल्यानंतर कट्टी ते उधमपूरपर्यंत जाणारी बस लतीयार नल्लाह येथे अडकली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत - चीन सीमेवरील शिपकला भागानजीक बुधवारी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. याच ठिकाणी इंडो-तिबेटियन दलाचे आणखी काही जवान गाडले गेल्याची भीती वर्तविण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने लष्कराला अडचणींचा सामना करावा लागत आहे.



मृत्यूमुखी पडलेले सर्व जवान जम्मू-काश्‍मीर रायफल्सचे असून, एका जवानाचा मृतदेह सापडला आहे. रमेश कुमार (४१), असे या जवानाचे नाव आहे. तसेच अन्य पाच जवान अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.  



कुलूमध्ये झालेल्या हिमस्खलनात एक चारचाकी गाडी वाहून गेली. जमलेला मातीचा ढिगारा उचलताना ही गाडी वाहून गेली. सध्या उत्तरकडे जोरदार बर्फवृष्टी होत आहे आणि त्यातच झालेल्या हिमस्खलनात ही गाडी वाहून गेली.