शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील सर्वच ६८ मतदार संघासाठी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात हा महामुकाबला होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीच्या रिंगणात ६२ आमदारांसह ३३७ उमेदवाराचं भविष्य मतदार आज पेटीत बंद करणार आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरूवात झाली आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सत्ताधारी कॉंग्रेस आणि माजी मुख्यमंत्री धुमल यांच्या नेतॄत्वात भाजप सर्वच ६८ जागांवर लढत आहे. तर बसपा ४२, माकपा १४, स्वाभिमान पार्टी आणि लोक गटबंधन पक्ष सहा-सहा जागांवर लढत आहेत. आणि भाकपा तीन जागांवर लढत आहे. प्रचार चांगलाच रंगला कॉंग्रेस आणि भाजपच्या स्टार प्रचारकांनी ४५० पेक्षा जास्त प्रचार रॅली केल्या. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी क्रमश: सात आणि सहा रॅलींना संबोधित केले. तर कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तीन रॅली केल्या. 



भ्रष्टाचाराला मुख्य मुद्दा करून प्रचार अभियानात भाजपाने मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यार जोरदार टीका केली. तर कॉंग्रेसने भाजपला जीएसटी आणि नोटाबंदीवरून धारेवर धरले. धर्मशाला मतदार संघात सर्वात जास्त १२ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री सिंह आणि माजी मुख्यमंत्री धुमल दोघांनीही आपल्या जागा बदलल्या आहेत्त. ते अरकी आणि सुजानपूर येथून लढत आहेत. राज्यात एकूण ५०,२५,९४१ वैध मतदार असून राज्यात एकूण ७ हजार ५२५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. 



त्यासोबतच मुख्य निर्वाचन अधिकारी पुष्पेंद्र राजपूत यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आणि होमगार्डचे १७ हजार ८५० जवानांना तैनात करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय अर्धसैन्य दलाच्या ६५ तुकड्याही तैनात करण्यात आल्या. सकाळी आठपासून सुरू झालेलं मतदान सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. पहिल्यांदाच विधानसभेसाठी वीवीपीएटी मशीनचा वापर होत आहे.