COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये शाळेची बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत शाळेतील २६ चिमुरड्यांसहीत २९ जण ठार झालेत. मुलांशिवाय या शाळेच्या बस अपघातात दोन शिक्षक आणि ड्रायव्हरचाही मृत्यू झालाय. या बसमधून एकूण ४० जण प्रवास करत होते, अशी माहिती मिळतेय.


मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. कांगडा जिल्ह्यातील नूरपूरमध्ये ही घटना घडली. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालीय. बचावकार्य वेगानं सुरु आहे. 



शाळेमधून सुटलेल्या मुलांना घरी पोहचवण्यासाठी ही बस निघाली होती. प्राथमिक माहितीनुसार, या बसचा वेग जास्त होता... वळणावळणाच्या रस्त्यावर ड्रायव्हरचं वेगावरचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली.