शिमला : हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये रविवारी झालेल्या भूस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आता ४६ वर पोहोचला आहे. या धक्कादायक घटनेत रस्त्याचा १५० मीटरपेक्षा जास्त भाग कोसळला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात अनेक घरे, दोन बस आणि काही वाहने मलब्याखाली गेली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत मलब्याखालून ४६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर पाच जखमींना वाचण्यात आलं आहे.  


सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, ‘रात्री बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. कारण तिथे आणखीही भूस्खलन होण्याची शक्यता आहे. सकाळी पुन्हा मदतकार्य सुरू करण्यात येईल’. एकूण मृतदेहांपैकी २३ मॄतदेहांची ओळख अजून पटलेली नाही. तर एका बाईलस्वाराचाही मृतदेह काढण्यात आला आहे. 


रविवारी साधारण १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये झालेल्या भूस्खलनात अनेकांच्या मृत्यूमुळे दु:ख झालंय. मॄतकांच्या कुटुंबियांसोबत आमची संवेदना आहे’.