मंडी : हिमाचल प्रदेशच्या मंडी इथं भूस्खलन होऊन 7 जणांचा मृत्यू झालाय. भूस्खलनानंतर ढिगा-याखाली आणखी एक बस अडकल्याची भीती व्यक्त होतेय. तसंच भूस्खलानामुळे दोन सरकारी बसेस अडकल्याचही बोललं जातंय. याशिवाय एक बोलेरो जीप आणि बाईकही ढिगा-याखाली गाडली गेलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूस्खलनानंतर मातीचा ढिगारा चार घरांवर कोसळला. सुदैवानं या घरांमधील नागरिक वेळीच घरातून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या भूस्खलनामुळे हायवेवरील जवळपास दीडशे मीटर रस्त्याचं नुकसान झालंय.


तर याठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून एनडीआरएफला घटनास्थळी पाचारण करण्यात आलय. सध्या भूस्खलनाच्या शक्यतेमुळे मंडीहून औटपर्यंतचा हायवे बंद करण्यात आलाय.