SEBI chaiperson Madhabi Puri Buch : अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. हिंडेनबर्गच्या नव्या रिपोर्टमध्ये सेबीच्या चेअरमन माधबी पुरी-बूच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात सेबीच्या चेअरमन माधबी पुरी-बूच यांचाच हात होता, असा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती, असा आरोप हिंडेनबर्ग रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हिंडेनबर्गच्या या रिपोर्टनंतर आता भारतात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी आणि त्यांचे पती धवल बुच यांची बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांमध्ये छुपे हिस्सेदारी होती. याचा वापर विनोद अदानी यांनी केला होता. माधबी पुरी आणि त्यांचे पती धवल बुच यांचं 5 जून, 2015 रोजी सिंगापूरमध्ये आयपीई प्लस फंड 1 मध्ये खातं उघडलं होतं. यामध्ये त्यांच्या गुंतवणुकीचा स्रोत हा त्यांचा पगारच दाखवण्यात आला आहे. तसेच या जोडप्याची एकूण संपत्ती 10 दशलक्ष डॉलर एवढी आहे, असं कागदपत्रांनुसार समजतंय, असं हिंडनबर्ग अहवालात म्हटलं आहे. 


माधबी बुच आणि त्यांच्या पतीने बर्म्युडा आणि मॉरिशसमधील अस्पष्ट ऑफशोर फंडांमध्ये अघोषित गुंतवणूक केली होती, याच संस्थांचा वापर गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांनी आर्थिक बाजारात फेरफार करण्यासाठी केला होता, असा धक्कादायक आरोप हिंडनबर्ग रिसर्चमधून करण्यात आला आहे. सिंगापूरमधील Agora Partners नावाच्या सल्लागार कंपनीत त्यांची 100 टक्के भागीदारी होती. 16 मार्च 2022 रोजी SEBI चेअरपर्सन म्हणून माधबी पुरी यांची नियुक्ती होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी, त्यांनी शेअर्स पतीच्या नावावर हस्तांतरित केले होते, असा खुलासा देखील करण्यात आला आहे.


दरम्यान, हिंडनबर्ग रिसर्चने जानेवारी 2023 मध्ये अदानी ग्रुपच्या विरोधात एक रिपोर्ट जारी केला होता.आम्ही अदानी ग्रुपच्या शेअर्ससंदर्भात शॉर्ट पोझिशन घेऊन ठेवली आहे. भारतीय शेअर बाजारात थेट व्यवहार करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी नेमकी कोणासाठी शॉर्ट सेलिंग पोझिशन घेतली हे स्पष्ट केलं नव्हतं. हिंडनबर्ग रिसर्चने गौतम अदांनीविरोधात रिपोर्ट सादर केल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सच्य किंमती जोरदार आपटल्या होत्या.


अदानी घोटाळ्याचा खुलासा केल्यानंतर 27 जून 2024 रोजी SEBI ने आम्हाला 'कारणे दाखवा' नोटीस पाठवली. SEBI ने आमच्या 106-पानांच्या विश्लेषणामध्ये कोणत्याही तथ्यात्मक त्रुटींचा आरोप केला नाही, असं हिंडनबर्गने म्हटलं आहे.