सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप; पदावर असताना घेतले कोट्यवधी
Hindenburg : हिंडनबर्गच्या अहवालानंतर सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच अडचणीत आल्या होत्या. आता काँग्रेसनंही सेबी अध्यक्षांवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केलीय.
SEBI Madhabi Puri Buch: हिंडेनबर्गच्यां अहवालात सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच यांच्यावर आरोप करण्यात आले होते. आता काँग्रेसनंही माधबी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सेबी अध्यक्षांनी सेबीच्या कलम 54 चं उल्लंघन केल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केलाय.
2017 मध्ये माधवी पुरी बुच ह्या सेबीच्या पूर्णवळ संचालक झाल्या.त्यानंतर 2022 मध्ये त्यांची सेबी अध्यक्षपदी निवड झाली. 2017 ते 2024 या कालावधीत त्यांनी ICICI बँक आणि ICICI प्रूडेंशियलकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा मोठा आरोप काँग्रेसनं केलाय.
सेबी अध्यक्षांवर काँग्रेसचा आरोप
सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी 2017 ते 2021 या कालावधीत ICICI बँकेकडून पगाराच्या स्वरूपात तब्बल 12 कोटी 63 लाख रुपये घेतले. तर ICICI प्रूडेंशियलकडून 22 कोटी 41 लाख रुपये घेतले. तर 2021 ते 2023 दरम्यान सेबी अध्यक्षांनी ESOP स्वरूपात 2 कोटी 84 लाख रुपये घेतले. तसेच या ESOP वरील 1 कोटी 10 लाखांचा टीडीएसही ICICI बँकेनं भरलाय.
2017 पासून ते आत्तापर्यंत सेबी अध्यक्षांनी ICICI कडून 16 कोटी 80 लाख 22 हजार 143 रुपये घेतलेत. तर याच कालावधीत सेबी अध्यक्ष असताना त्यांना 3 कोटी 30 लाख 28 हजार 246 कोटी रुपये घेतलेत. म्हणजेच माधबी पुरी बुच यांनी पगारासोबतच इतर कंपन्यांकडून पैसे घेतले असा आरोप काँग्रेसने केलाय.
काय आहेत काँग्रेसचे सेबी अध्यक्षांवर आरोप ?
सेबीच्या कलम 54 चं उल्लंघन केलंय. तसेच कलम 5 नुसार त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केलंय. सेबी अध्यक्षपदाचा दुरूपयोग केला. सरकारी पगारासोबतच पैसे घेऊन ICICI बँकेशी संबंधित प्रकरणं निकाली काढली.
ICICI समूह आणि सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच यांचे सबंध जुने आहेत. माधवी पुरी या ICICI बँकेच्या व्यवस्थापन मंडळात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यासोबतच त्यांनी ICICI सिक्युरिटीजच्या सीईओ म्हणूनही काम केलंय.
ICICI सिक्युरिटीज ही कंपनी शेअर बाजार आणि आर्थिक क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. तर संपूर्ण आर्थिक क्षेत्राचं नियामक म्हणून काम करणारी सेबी ही सरकारी संस्था असल्यानं सेबी अध्यक्षांची मोठी जबाबदारी आहे. अशावेळी माधबी पुरी बुच यांच्यावर काँग्रेसने केलेल आरोप अत्यंत गंभीर आहेत.