जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे असं म्हटलं जातं. निसर्ग नियमानुसार कोणतीही सजीव गोष्ट अमर नाही आणि याला मनुष्यही अपवाद नाही. जन्म घेतलेल्या प्रत्येक प्राण्याला किंवा मनुष्याला कधी ना कधी या जगाचा निरोप घ्यावा लागतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अनेकदा त्याच्या अंत्ययात्रेमध्ये चालणारे तसेच त्याच्या पार्थिवाला खांदा देणारे लोक 'राम नाम सत्य है' असं म्हणतात. मात्र एखाद्याच्या अंत्ययात्रेमध्ये 'राम नाम सत्य है' असं अगदी स्मशानभूमीमध्ये पोहचेपर्यंत का म्हटलं जातं तुम्हाला ठाऊक आहे का?


मूळ हिंदी की संस्कृत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं सांगायचं झालं तर 'राम नाम सत्य है' असं अंत्ययात्रेमध्ये बोलण्यास नेमकी कधीपासून सुरुवात झाली हे सांगता येणार नाही. हे शब्द मूळ हिंदी भाषेतील आहेत की संस्कृत भाषेतील एखाद्या रचनेशी या वाक्याचा संबंध आहे याबद्दल संभ्रम आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या सांगण्यानुसार 'राम नाम सत्य है' हे वाक्य मूळचं हिंदी भाषेतील आहे. हिंदी भाषेची उत्पत्ति अमीर खुसरोनंतर झाली होती. यापूर्वी केवळ संस्कृत भाषा बोलली जायची. खुसरोच्या आधीच्या काळात हिंदी अस्तित्वात नव्हती.


अमर राहणे


अनेकदा आपण कायम स्वरुपी या जगात राहू, आपण अमर होऊ, आपण कधीच मरणार नाही असे वाटणारी लोकही दिसून येतात. मात्र मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा निघते तेव्हा अगदी कोट्याधीश व्यक्तीपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचाच शेवटचा प्रवास हा जवळच्या व्यक्तींच्या खांद्यावरुनच होतो. हिंदू धर्मामध्ये अंत्ययात्रेदरम्यान 'राम नाम सत्य है' चा जाप केला जातो. अगदी स्मशानात पोहचेपर्यंत अंत्ययात्रेबरोबर चालणारे लोक हा जाप करताना दिसतात.


यक्षाची गोष्ट


पौराणिक कथांनुसार एकदा यक्षाने युधिष्ठिराला विचारलं की जगामध्ये सर्वात आश्चर्यचकित करणारी कोणती गोष्ट तू पाहिली आहेस? या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तर तुझे सर्व भाऊ जीवंत राहतील नाहीतर ते पडलेल्या अवस्थेतच मरण पावतील असं यक्षाने युधिष्ठिराला हा प्रश्न विचारताना सांगितलं. या प्रश्नाला उत्तर देताना युधिष्ठिराने, "यक्ष महाराज, मी जगात जी सर्वात विचित्र गोष्ट पाहिली आहे ती आहे, स्मशान!" असं सांगितलं.


कर्म


कोणतीही व्यक्ती जेव्हा स्मशानामध्ये असते तेव्हा ती फार दुखात असते. सामान्यपणे कोणतीही व्यक्ती संसारातील मोह-मायेमध्ये अडकलेली असते. मात्र जेव्हा व्यक्ती स्मशानामधून बाहेर पडतो तेव्हा पुन्हा तो त्याच गर्तेत अडकतो आणि त्यासाठीच काम करतो.


राम हेच अंतिम सत्य


राम केवळ राजा दशरथाचा पुत्र नव्हता. हे नाव अनंत आहे असं म्हटलं जातं. कोणी आपल्या मुलांचं नाव शंकर ठेवतं तर कोणी गणेश. राम हे फार सरळ आणि अनंत नाव असल्याने कोणालाही हे नाव सहज घेता येतं. जगामध्ये केवळ राम नामच परम सत्य आहे असं म्हणालं जातं. राम नामचं अंतीम सत्य आहे बाकी सारं काही खोटं आहे. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीचं पार्थिव स्मशानामध्ये घेऊन जाताना शेवटच्या प्रवासामध्ये रामाचं नाव घेतलं जातं. रामाचं नाव वगळता बाकी साऱ्या गोष्टी मोह-माया आहेत त्यामुळेच राम नाम सत्य है असं म्हटलं जातं.


(Disclaimer: वर देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि गृहितकांवर आधारित आहे. 'झी २४ तास' याचं समर्थन करत नाही.)